IPL 2021, KKR vs SRH T20 Live : Nitish Rana celebration fifty with showing fingers, know the reason  | IPL 2021, KKR vs SRH T20 Live : नितीश राणानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं खास स्टाईलमध्ये, त्यामागे आहे विशेष कारण!

IPL 2021, KKR vs SRH T20 Live : नितीश राणानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं खास स्टाईलमध्ये, त्यामागे आहे विशेष कारण!

IPL 2021 : KKR vs SRH  T20 Live Score Update : कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR) सलामीवीर नितीश राणा ( Nitish Rana) यानं सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांची धुलाई केली. राहुल त्रिपाठीनं ( Rahul Tripathi) हात धुऊन घेतले. नितीश व राहुलनं अर्धशतकी खेळी करताना SRHच्या गोलंदाजांना हतबल केलं. राहुलनं ५३ धावा चोपल्या. नितीशला शतकानं हुलकावणी दिली. नितीशनं ५६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ८० धावा चोपल्या. हे दोघंही माघारी परतल्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. पण, दिनेश कार्तिकनं मॅच फिनिशर इनिंग खेळताना ९ चेंडूंत २२ धावा चोपल्या.  नितीश राणानं अर्धशतकानंतर बोटातील अंगठी दाखवून सेलिब्रेशन केलं आणि त्याच्या या कृतीची चर्चा सुरू झाली. ipl 2021 t20 KKR vs SRH live match score updates chennai तीन सुपर डूपर कॅच अन् SRHनं सामना फिरवला, Manish Pandeyची कॅच पाहून मालकिणबाई खूश झाल्या, Video 

KKR नं नितीश राणा व शुबमन गिल या जोडीनं ५३ धावांची सलामी दिली. राहुल त्रिपाठीने २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा केल्या. नितीश व राहुल यांची ५० चेंडूंत ९० धावांची भागीदारी टी नटराजननं तोडली. त्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केले. मोहम्मद नबीनं सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेत नितीश व इयॉन मॉर्गन यांना माघारी पाठवले. आंद्रे रसेलही मोठी खेळी करू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचं जबरदस्त कमबॅक, अखेरच्या पाच षटकांत ४२ धावांत घेतल्या पाच विकेट्स घेतल्या.  नितीशनं हे अर्धशतक पत्नी सांची मारवाह हिला समर्पित केली.  IPL 2021 : KKR vs SRH T20 Live Score Update5⃣0⃣-run stand between Nitish Rana & Rahul Tripathi 👍👍

1⃣0⃣0⃣ up Kolkata Knight Riders 👌👌

#VIVOIPL #SRHvKKR vivo

Follow the match 👉 bit.ly/IPL-2021-03

Posted by IPL - Indian Premier League on Sunday, April 11, 2021

आयपीएल २०२०दरम्यान झालेलं सासऱ्यांचं निधन
आयपीएलच्या मागील पर्वात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची अर्धशतकी खेळी नितीश राणानं दिवंगत सासरे सुरिंदर यांना समर्पित केली होती. नितीशनं त्या सामन्यात ५३ चेंडूंत ८१ धावा केल्या होत्या. त्यासामन्यात नितीशनं सुरिंदर नावाची जर्सी दाखवत सेलिब्रेशन केलं होतं. २३ ऑक्टोबर २०२०मध्ये कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, KKR vs SRH T20 Live : Nitish Rana celebration fifty with showing fingers, know the reason 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.