IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; MIच्या सलामीवीरासोबत केला होता प्रवास

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात आणखी एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 03:42 PM2021-04-14T15:42:50+5:302021-04-14T15:48:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Delhi Capitals bowler Anrich Nortje has been tested positive for COVID19 while he was in quarantine | IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; MIच्या सलामीवीरासोबत केला होता प्रवास

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह; MIच्या सलामीवीरासोबत केला होता प्रवास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नितीश राणा, देवदत्त पडिक्कल आणि अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि या सर्वांनी त्यावर मात केली. नितीशनं तर दमदार कमबॅक केले आणि आता देवदत्त व अक्षर पुनरागमनासाठी फिट झाले आहेत. पण, दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) प्रमुख गोलंदाज एनरिच नॉर्ट्जे ( Anrich Nortje) याचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला आणि तो आता क्वारंटाईन झाला आहे. अक्षर पटेलनंतर DCसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे. SRHचा सामना करण्यापूर्वी विराट कोहलीला मिळाली वाईट बातमी; पाकिस्तानच्या फलंदाजानं दिला मोठा धक्का

ANIला सूत्रांनी सांगितले की,''तो भारतात आला तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता, परंतु त्याची चाचणी झाली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला. तो सध्या क्वारंटाईन झाला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाग्रस्त आढळल्यास तो किमान १० दिवसांसाठी क्वारंटाईन होणे गरजेचे आहे.'' नॉर्ट्जे पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका अर्ध्यावर सोडून आयपीएलसाठी भारतात दाखल झाला होता. त्याच्यासोबत क्विंटन डी कॉक ( मुंबई इंडियन्स), कागिसो रबाडा ( दिल्ली कॅपिटल्स), लुंगी एनगिडी ( चेन्नई सुपर किंग्स ) आणि डेव्हिड मिलर ( राजस्थान रॉयल्स) हेही भारतात दाखल झाले होते. IPL 2021 : 'पोलार्ड आऊट झाला का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या Live भाषणादरम्यान MI चाहत्यांची चर्चा! 

दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. त्यानंतर पहिल्यासामन्याआधी प्रमुख गोलंदाज अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार


आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू
गतवर्षी यूएईत झालेल्या १३व्या पर्वात नॉर्ट्जेनं आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवाग चेंडू टाकण्याचा विक्रम नावावर केला होता. त्यानं राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला १५६.२ किलोमीटर प्रतीतास या वेगानं चेंडू फेकून अचंबित केलं होतं. पण, त्याच्या पुढच्याच चेंडूवर नॉर्ट्जेनं १५५.१च्या वेगानं चेंडू टाकून बटलरचा त्रिफळा उडवला होता.  

Web Title: IPL 2021 : Delhi Capitals bowler Anrich Nortje has been tested positive for COVID19 while he was in quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.