IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update :  आयपीएल २०२०तून माघार घेतल्यानंतर प्रथमच चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) जर्सीत दिसलेल्या सुरेश रैनानं ( Suresh Raina) दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची वाट लावली.  १ वर्ष, १० महिने, २९ दिवसानंतर सुरेश रैना मैदानावर उतरला अन् वादळासारखा घोंगावला!


CSKचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैनानं तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे मोईन अली व अंबाती रायुडू यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना CSKचा डाव सावरला. सुरेश रैना व मोईन अली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी करून चेन्नईची गाडी रुळावर आणली. अली २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला.  गोलंदाज आडवा आला अन् सुरेश रैना धावबाद झाला, नव्या वादाची चिन्ह, Video 


अंबाती रायुडू १६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २३ धावांवर माघारी परतला. १६व्या षटकात रैना रन आऊट झाला. आवेश खानच्या गोलंदाजीवर दुसरी धाव घेताना रैना व रवींद्र जडेजा यांच्यातील ताळमेळ चुकला अन् रैनाला माघारी परतावे लागले. त्यानं ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५४ धावा केल्या.  सुरेश रैना ६९९ दिवसानंतर मैदानावर उतरला अन् काय तुफान खेळला; रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी 

महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजा व सॅम कुरन यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना चेन्नईला मोठी मजल मारू दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना चेन्नईला २० षटकांत ७ बाद १८८ धावा करून दिला. सॅम १५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३४ धावा चोपून माघारी परतला. जडेजा १७ चेंडूंत ३ चौकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला.  Video : राहुल द्रविड बनला 'इंदिरानगरचा गुंडा'; मुंबई पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल

सुरेश रैना म्हणाला, ''चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात परतून धावा करण्यात यशस्वी झाल्याचा आनंद वाटतोय. आम्ही चांगली सुरुवात केली, चांगल्या भागीदारी केल्या. मी सकारात्मक खेळ करण्यावर भर दिला. देवाची कृपा आहे आणि त्यानं माझ्याकडून चांगली तयारी करून घेतली. सॅम कुरन व जडेजा यांनी अखेर्चाय षटकांत दमदार खेळ केला. या धावांचा पाठलाग करणं, सोपं नाही.''  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : Suresh Raina - It's always a good feeling to score for Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.