IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड हे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैना ( Suresh Raina) व मोईन अली ( Moeen Ali) यांनी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) डाव सावरला. दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) च्या गोलंदाजांची धुलाई करताना दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यूएईत झालेल्या आयपीएलला चेन्नईला मधल्या फळीतील समस्या सतावत होती, परंतु रैनाच्या येण्यानं ती बाजू भक्कम झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ६९९ दिवसानंतर CSK कडून पहिलाच सामना खेळणाऱ्या सुरेश रैनाच्या तुफान फटकेबाजीनं DC च्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. रैनानं अर्धशतकी खेळी करून विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.  IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update

इशांत शर्मा दुखापतग्रस्त
रिषभ पंतनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  दिल्लीच्या संघात दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी. टॉम कुरन व ख्रिस वोक्स हे आज खेळणार. दिल्लीसाठी १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या अमित मिश्राचा विशेष कॅप देऊन सन्मान करण्यात आला.  दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची भिस्त, ख्रिस वोक्स, मार्कस स्टॉयनिस, टॉम कुरन, ए खान, अमित मिश्रा व आर अश्विन यांच्यावर असणार आहे. इशांत शर्माला दुखापतीमुळे या सामन्यात खेळता येत नाही. इशांतनं ९० सामन्यांत ७२ विकेट्स घेतल्या आहेत.  IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update

CSK चे दोन्ही सलामीवीर ७ धावांवर माघारी 
दुसऱ्याच षटकात आवेश खाननं CSKला पहिला धक्का दिला. फॅफ ड्यू प्लेसिसला त्यानं भोपळ्यावर पायचीत केलं. Bowlers to dismiss Faf Duplessis on Duck in IPL आयपीएलमध्ये चौथ्यांदा फॅफ शून्यावर माघारी परतला आहे. यापूर्वी भुवनेश्वर कुमार ( २०१४), मिचेल जॉन्सन ( २०१४) आणि संदीप शर्मा ( २०२०) यांनी ही कामगिरी केली होती. ऑगस्ट २०१८नंतर पहिलाच ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या आणि DCकडून पदार्पण करणाऱ्या ख्रिस वोक्सनं CSKचा दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला ( ५) शिखर धवनकरवी स्लीपमध्ये झेलबाद केले. ipl 2021  t20 Csk vs dc live match score updates mumbai

६९९ दिवसांनी सुरेश रैना मैदानावर उतरला
आयपीएलच्या १३व्या पर्वासाठी सर्व संघ यूएईत दाखल झाले. चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) दोन खेळाडू व १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं सर्वांचं टेंशन वाढलं होतं. त्यात संघातील प्रमुख खेळाडू सुरेश रैना यानं वैयक्तिक कारण देत स्पर्धेतूनच माघार घेतली. त्याच्या या माघारीमागे कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सोबत झालेला वाद असल्याची चर्चा रंगली होती. पण, या सर्व चर्चाच ठरल्या आणि १ वर्ष, १० महिने आणि २९ दिवसानंतर सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळताना दिसत आहे. सुरेश रैनानं १९४ सामन्यांत ५३७२ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व ३८ अर्धशतकं आहेत. CSK vs DC Live Score, IPL 2021 CSK vs DC

मोईन अली- सुरेश रैनाची अर्धशतकी भागीदारी
सुरेश रैना व मोईन अली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी करून चेन्नईची गाडी रुळावर आणली. आर अश्विननं टाकलेल्या ९व्या षटकात सलग दोन षटकार खेचल्यानंतर तिसरा फटका मारण्याचा मोह अलीला आवरता आला नाही. शिखर धवननं त्याचा सुरेख झेल टिपला. अली २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला. त्याच षटकात रैनानं खणखणीत षटकार खेचून १८ धावा चोपल्या. 

सुरेश रैनाचे ३९ वे अर्धशतक
सुरेश रैनानं तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे मोईन अली व अंबाती रायुडू यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना CSKचा डाव सावरला. त्यानं ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचे हे ३९वे अर्धशतक ठरले आणि त्यानं विराट व रोहित यांच्या ३९ अर्धशतकांशी बरोबरी केली. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : After 699 days Suresh Raina is playing his first match for CSK, he brings up his 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.