IPL 2021 : CSK vs DC T20 Live : १ वर्ष, १० महिने, २९ दिवसानंतर सुरेश रैना मैदानावर उतरला अन् वादळासारखा घोंगावला!

IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) भोपळाही फोडू शकला नाही. त्यानं रचलेल्या मजबूत पायावर रवींद्र जडेजा व सॅम कूरन यांनी अखेरच्या षटकांत दमदार फटकेबाजी करून धावांचा डोंगर उभा केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 09:15 PM2021-04-10T21:15:37+5:302021-04-10T21:17:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : CSK finish with 188 for 7 from 20 overs, Suresh Raina brillient half century | IPL 2021 : CSK vs DC T20 Live : १ वर्ष, १० महिने, २९ दिवसानंतर सुरेश रैना मैदानावर उतरला अन् वादळासारखा घोंगावला!

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : १ वर्ष, १० महिने, २९ दिवसानंतर सुरेश रैना मैदानावर उतरला अन् वादळासारखा घोंगावला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : आयपीएल २०२०तून माघार घेतल्यानंतर प्रथमच चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) जर्सीत दिसलेल्या सुरेश रैनानं ( Suresh Raina) दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची वाट लावली. CSKचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैनानं तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे मोईन अली व अंबाती रायुडू यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना CSKचा डाव सावरला. पण, रैना माघारी परतताच दिल्लीनं सामन्यात कमबॅक केले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) भोपळाही फोडू शकला नाही. त्यानं रचलेल्या मजबूत पायावर रवींद्र जडेजा व सॅम कूरन यांनी अखेरच्या षटकांत दमदार फटकेबाजी करून धावांचा डोंगर उभा केला.  गोलंदाज आडवा आला अन् सुरेश रैना धावबाद झाला, नव्या वादाची चिन्ह, Video 

फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड हे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैना ( Suresh Raina) व मोईन अली ( Moeen Ali) यांनी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) डाव सावरला.  दुसऱ्याच षटकात आवेश खाननं CSKला पहिला धक्का दिला. फॅफ ड्यू प्लेसिसला त्यानं भोपळ्यावर पायचीत केलं. ख्रिस वोक्सनं CSKचा दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला ( ५) शिखर धवनकरवी स्लीपमध्ये झेलबाद केले. सुरेश रैना व मोईन अली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी करून चेन्नईची गाडी रुळावर आणली. अली २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला.  IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update   IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update

सुरेश रैनाचे ३९ वे अर्धशतक अन् रोहित-विराटच्या विक्रमाशी बरोबरी
सुरेश रैनानं तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे मोईन अली व अंबाती रायुडू यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना CSKचा डाव सावरला. त्यानं ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचे हे ३९वे अर्धशतक ठरले आणि त्यानं विराट व रोहित यांच्या ३९ अर्धशतकांशी बरोबरी केली. अंबाती रायुडू १६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २३ धावांवर माघारी परतला. १६व्या षटकात रैना रन आऊट झाला. आवेश खानच्या गोलंदाजीवर दुसरी धाव घेताना रैना व रवींद्र जडेजा यांच्यातील ताळमेळ चुकला अन् रैनाला माघारी परतावे लागले. त्यानं ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५४ धावा केल्या. दुसरी धाव घेताना आवेश खान जडेजाच्या मार्गात उभा होता आणि त्यामुळे रैनाला तो कॉल करू शकला नाही. त्यामुळे रैनाला रन आऊट होऊन माघारी जावं लागलं. 

रवींद्र जडेजा व सॅम कुरन यांची फटकेबाजी
महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजा व सॅम कुरन यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना चेन्नईला मोठी मजल मारू दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना चेन्नईला २० षटकांत ७ बाद १८८ धावा करून दिला. सॅम १५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३४ धावा चोपून माघारी परतला. जडेजा १७ चेंडूंत ३ चौकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: IPL 2021 CSK vs DC Live T20 Score : CSK finish with 188 for 7 from 20 overs, Suresh Raina brillient half century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.