Do’s & Dont’s for IPL 2021 : विराट कोहलीचं BCCIनं ऐकलं; वादग्रस्त नियम रद्द करून जाहीर केली नियमावली!

IPL 2021: इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे आणि कोरोना व्हायरसचं संकट समोर असताना BCCIनं नियमावली तयार केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 01:52 PM2021-03-31T13:52:25+5:302021-03-31T13:58:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: BCCI’s strict instruction to IPL Teams, ‘follow these Do’s & Dont’s for IPL 2021 | Do’s & Dont’s for IPL 2021 : विराट कोहलीचं BCCIनं ऐकलं; वादग्रस्त नियम रद्द करून जाहीर केली नियमावली!

Do’s & Dont’s for IPL 2021 : विराट कोहलीचं BCCIनं ऐकलं; वादग्रस्त नियम रद्द करून जाहीर केली नियमावली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे आणि कोरोना व्हायरसचं संकट समोर असताना BCCIनं नियमावली तयार केली आहे. ( IPL 2021 – BCCI issues Do’s & Dont’s to IPL Franchises). कोरोना व्हायरसची वाढती संख्या लक्षात घेता बीसीसीआयनं ही नियमावली तयार केली आहे आणि त्याचं काटेकोरपणे पालन करणे हे आयपीएल फ्रँचायझी, खेळाडू, अम्पायर आणि सपोर्ट स्टाफला करावेच लागणार आहे. तसे न झाल्यास BCCIकडून कठोर पाऊल उचलले जाईल.  मुंबई इंडियन्सला पराभूत करणं अवघड, 'हे' खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड; दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी


IPL 2021 Rules: Don’ts:  काय करू नये...

  1. कुटुंबातील सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बायो-बबलमध्ये येत येणार नाही. त्यामुळे जर कुटुंबातील एखादा सदस्य खेळाडू किंवा स्टाफला भेटण्यासाठी येणार असेल, तर त्याची कल्पना BCCI व मुख्य वैद्यकिय अधिकारी यांना द्यावी लागेल. संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बायो बबलच्या बाहेर जाता येणार नाहा. टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर हल्ला, गाडीची तोडफोड; भाजपाच्या तिकिटावर लढवतोय निवडणूक
  2. हॉटेलमधील अन्य पाहुण्यांना भेटण्याची मनाई. हॉटेलमधील पाहुण्यांना आणि खेळाडूंना वेगळी विंग देण्यात आली आहे. त्यामुळे पाहुण्यांना भेटण्याची सक्त मनाई आहे. 
  3. मीडियाला प्रवेश नाकारण्यात आलेला नाही. खेळाडूंनीही मीडियाच्या प्रतिनिधिंना भेटू नये आणि IPL 2021तही मीडियाला परवानगी दिली गेलेली नाही.  सचिन तेंडुलकर, पठाण बंधू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकारनं संपूर्ण संघालाच केलं क्वारंटाईन!
  4. सॉफ्ट सिग्नलचा नियम यंदाच्या आयपीएलमध्ये नसेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सॉफ्ट सिग्नल निर्णयावर कर्णधार विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तो नियम आयपीएल २०२१त नसेल.
  5. चेंडूला थूंकी लावू नये. 

 

IPL 2021 Rules: Do’s: काय करावं...

  1. सात दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन - आयपीएल बायो-बबलमध्ये दाखल होताच सात दिवसांच्या क्वारंटाईन कालावधी खेळाडूंना पूर्ण करावा लागेल. हाच नियम खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही लागू असेल.  
  2. या स्पर्धेत बबल-टू-बबल असे ट्रान्स्फर असणार आहे. (  bubble-to-bubble transfers). याचा अर्ध एखादा खेळाडू किंवा कोचिंग स्टाफचा सदस्य आंतरराष्ट्रीय मॅचमधूल आल्यास तो आयपीएल बायो-बबलमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण न करताच दाखल होऊ शकतो. पण, ते खेळाडू किंवा स्टाफ चार्टर्ड विमान किंवा प्रायव्हेट कारनं येत असेल तरच त्याला आयपीएल बायो-बबलमध्ये येता येईल. रिषभ पंतकडे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी; जाणून घ्या ८ फ्रँचायझींचे कर्णधार अन् त्यांचे वय!
  3. बीसीसीआयच्या आदेशानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाचा डाव ९० मिनिटांच्या आत संपायला हवा. याआधी प्रत्येक डावाचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला सुरु व्हायला हवं, असा नियम होता. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार सामन्याचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला संपायला हवं. 
  4. बबल बाहेरील खेळाडूशी संपर्क आल्यास मैदानावरील खेळाडूनं त्वरित जर्सी बदलावी.  खेळाडूंची चूक कॅप्टनला महागात पडणार; तर विराट कोहली, रोहित शर्मा, MS Dhoni यांच्यावर थेट बंदीची कारवाई होणार!
  5. चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास त्याला सॅनिटाईझ करावे
     

Web Title: IPL 2021: BCCI’s strict instruction to IPL Teams, ‘follow these Do’s & Dont’s for IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.