IPL 2020: These companies are frontrunner to be the title sponsor in place of VIVO | IPL 2020 : VIVOनं माघार घेतल्यानंतर टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत JIOसह तिघांमध्ये चुरस?

IPL 2020 : VIVOनं माघार घेतल्यानंतर टायटल स्पॉन्सरच्या शर्यतीत JIOसह तिघांमध्ये चुरस?

भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावामुळे देशात चिनी वस्तूंवर बहिष्काराची मागणी जोर धरत आहे. अशात इंडियन प्रीमिअर लीगनं ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सर म्हणून VIVO कायम राहणार असल्याची घोषणा केल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर ( बीसीसीआय) टीका झाली. त्यानंतर VIVOनं स्वतः माघार घेताना यंदाच्या आयपीएलमध्ये आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरवरून माघार घेतली. त्यामुळे बीसीसीआयचे कोंडी झाली आहे. VIVOनं माघार घेतल्यामुळे बीसीसीआयला 440 कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे नवा टायटल स्पॉन्सर मिळवण्यासाठी बीसीसीआयची धडपड सुरू झाली आहे. यात JIO हे ना आघाडीवर असले तरी त्यांना आणखी दोघांकडून टक्कर मिळू शकते.

गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. Vivo India ने 2017मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसात आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. यापूर्वी पेप्सिको ही आयपीएलची टायटल स्पॉन्सर होते आणि त्यांनी 2016मध्ये 396 कोटी रुपये दिले होते. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत. 

पण, यंदाच्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरसाठी Reliance Jio, Byjus आणि Amazon यांची नावं पुढे येत आहेत.  यापैकी मुकेश अंबानीच्या JIO यांनी आघाडी घेतल्याची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भरच्या आवाहनात JIO सूट बसतं. बीसीसीआय आणि JIO यांच्यात प्रार्थमिक चर्चा झाली आहे, परंतु अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. JIOसह Byjuयाचीही चर्चा आहे. बायजूनं टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरचे हक्क मिळवले आहेत. शिवाय कोलकाता नाईट रायडर्सचे ते मुख्य स्पॉन्सर आहेत. KKRचा सहमालक शाहरुख खान हा बायजूचा ब्रँड अॅम्बेसीडर आहे. पण, VIVOकडून दिली जाणारी 440 कोटी इतकी रक्कम देण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे त्यांना डिस्काऊंट हवं आहे.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा 

राम मंदिर भूमिपूजनावर हसीन जहाँनं केली पोस्ट; फॅन्सनी दिली जीवे मारण्याची धमकी

'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!

Video : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा!

Fact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह? वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य

Apple iPhone 11 वर बंपर डिस्काऊंट; अ‍ॅमेझॉनवर मिळतेय घसघशीत ऑफर!

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020: These companies are frontrunner to be the title sponsor in place of VIVO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.