IPL 2020 Schedule: आयपीएलच्या नवा हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्सने रचला इतिहात; CSK, KKR चा मोडला विक्रम

इंडियन प्रीमिअर लीग 2020चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. 13व्या मोसमातील उद्घाटनीय सामना 29 मार्चला गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 04:27 PM2020-02-16T16:27:21+5:302020-02-16T16:27:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Schedule: Mumbai Indians will become 1st team to play most inauguration match of ipl to beat CSK and KKR | IPL 2020 Schedule: आयपीएलच्या नवा हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्सने रचला इतिहात; CSK, KKR चा मोडला विक्रम

IPL 2020 Schedule: आयपीएलच्या नवा हंगामापूर्वीच मुंबई इंडियन्सने रचला इतिहात; CSK, KKR चा मोडला विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग 2020चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. 13व्या मोसमातील उद्घाटनीय सामना 29 मार्चला गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएल जेतेपद पटकावले आहे, तर चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर तीन जेतेपदं आहेत. त्यामुळे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगणारी चुरस पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आज जाहीर झालेल्या वेळापत्रकानंतर मुंबई इंडियन्सच्या नावावर एक वेगळा विक्रम जमा झाला आहे. त्यांनी या विक्रमात चेन्नई आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनाही मागे टाकले आहे.

IPL 2020चं अधिकृत वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी, केव्हा व कशा लढती होणार

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ सातव्यांदा आयपीएलच्या उद्धाटनीय सामन्यात मैदानावर उतरणार आहे. आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यासह मुंबई इंडियन्स प्रत्येकी 6 वेळा आयपीएलच्या उद्घाटनीय सामना खेळणाऱ्या संघांत आघाडीवर होते. पण, आता मुंबई इंडियन्स 29 मार्चला CSK आणि KKR ला मागे टाकणार आहे.  

पण, सर्वाधिक अंतिम सामने खेळण्याचा मान महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे. चेन्नईने 8वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु त्यांना पाचवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. चेन्नईनंतर सर्वाधिक पाच अंतिम सामने खेळण्याचा मान मुंबई इंडियन्सकडे जातो. मुंबईने त्यापैकी चारवेळा जेतेपद पटकावले आहे. 


सर्वाधिक उद्घाटनीय सामने खेळणारे संघ
7 वेळा - मुंब इंडियन्स 
6 वेळा- चेन्नई सुपर किंग्स
6 वेळा - कोलकाता नाईट राइडर्स
3 वेळा- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
1 वेळा - डेक्कन चार्जर्स
1 वेळा - दिल्ली कॅपिटल्स
1 वेळा - रायझिंग पुणे सुपरजायंट्स
1 वेळा- सनराइझर्स हैदराबाद

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक शर्मा, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.

CSKची सलामीलाच मुंबई इंडियन्सशी गाठ; त्यानंतर कसा असेल त्यांचा प्रवास?

सनरायझर्स हैदराबाद पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना 

KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार?

Web Title: IPL 2020 Schedule: Mumbai Indians will become 1st team to play most inauguration match of ipl to beat CSK and KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.