IPL 2020 : Panic grips BCCI as Vivo likely to make IPL exit | IPL2020 : BCCIची चिंता वाढली; Vivo आयपीएलसोबतचा करार मोडण्याची शक्यता

IPL2020 : BCCIची चिंता वाढली; Vivo आयपीएलसोबतचा करार मोडण्याची शक्यता

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) होणार असल्यानं क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद संचारलं आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्यांच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे. गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण, त्याचवेळी त्यांनी Vivo हे टायटल स्पॉन्सर म्हणून कायम असतील, अशी केलेली घोषणा अनेकांना न पटणारी होती. आता Vivo आयपीएलसोबतचा करार मोडणार असल्याचे वृत्त येत आहे. पण Vivo हा करार मोडण्याच्या तयारीत आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं आहे. ( Panic grips BCCI as Vivo likely to make IPL exit)

...तर 69 वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्त व्हायला सांगाल का?; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सवाल

Vivo ही चिनी कंपनी आहे आणि मागील 48 तासांत सोशल मीडियावर IPL आणि Vivo यांना ट्रोल केले जात आहे. भारत-चीन सिमेवरील वाढत्या तणावामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा अशी मागणी जोर धरताना बीसीसीआयनं Vivoशी करार कायम ठेवल्यानं जोरदार टीका झाली. भारत सरकारनं चिनी अॅपवर बंदी घातली आहे. बीसीसीआयनं आता हा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. त्यामुळे Vivoला पर्याय शोधण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत Vivo संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ( Panic grips BCCI as Vivo likely to make IPL exit)

टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी सांगितले की,''Vivo यंदा आयपीएलसोबतचा करार मोडण्याच्या तयारीत आहे आणि हे निश्चित झाले आहे. आता बीसीसीआय आणि Vivo यांच्यात काय वाटाघाटी होते, यावर सर्वकाही अवलंबून आहे. या दोघांमध्येही तडजोड होईल. या प्रकरणात कायदेशीर पर्यायांचा विचार केला जाऊ शकत नाही'' ( Panic grips BCCI as Vivo likely to make IPL exit)

Vivo India ने 2017मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसात आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. यापूर्वी पेप्सिको ही आयपीएलची टायटल स्पॉन्सर होते आणि त्यांनी 2016मध्ये 396 कोटी रुपये दिले होते. Vivoने आता माघार घेतल्यास जागतिक बाजारात त्यांची वाईट प्रतीमा निर्माण होऊ शकते. शिवाय, कोरोना व्हायरसच्या संकटात बीसीसीआयला नवा स्पॉन्सर मिळणे अवघडच आहे. त्यामुळे सध्याच्या कराराच्या 50% कमी किमतीतही बीसीसीआयला स्पॉन्सर मिळाल, तर ती मोठी गोष्ट असेल, असेही सूत्रांनी म्हटले.  ( Panic grips BCCI as Vivo likely to make IPL exit)

मॅट फिशरच्या 'यॉर्कर'समोर फलंदाजानं घातलं लोटांगण; पाहा भन्नाट व्हिडीओ

MS Dhoniनं स्पष्टच सांगितले, 2019च्या वर्ल्ड कप संघासाठी तुझा विचार केला जाणार नाही; युवराज सिंगचा खुलासा 

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर रायफलधारी रणरागिणी?; व्हिडीओ व्हायरल

देशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020 : Panic grips BCCI as Vivo likely to make IPL exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.