अबुधाबी : राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी सरशी साधून मुंबई इंडियन्सने विजयाची हॅट्ट्रिक साधली. या विजयात फलंदाज आणि गोलंदाजांचेच नव्हे तर क्षेत्ररक्षकांचेही योगदान असल्याचे मत कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले.
सूर्यकुमार यादवने नाबाद ७९ धावांचा झंझावात केल्यानंतर हार्दिक पांड्याने नाबाद ३० धावा केल्या. यानंतर बुमराहने चार, पॅटिन्सन दोन आणि बोल्टने दोन गडी बाद केले, रॉयल्सच्या डावात किरोन पोलार्ड आणि बदली खेळाडू अनुकूल रॉय यांनी शानदार झेल घेत विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
सर्यकुमारचे कौतुक करीत रोहित पुढे म्हणाला, ‘मागच्या काही सामन्यात त्याने सुरेख फलंदाजी केली होती. मी त्याच्यासोबत चर्चा केली. असा धडाका करेल, याची कल्पनादेखील आली होती. त्याने अगदी योग्य फटकेबाजी केली.’
पराभूत राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला, मागच्या तीन सामन्यात आमची सुरुवात खराब झाली. लवकर गडी गमावल्यामुळे पराभवाची नामुष्की येते. जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांच्याशिवाय अन्य अनुभवी खेळाडूंना योगदान द्यावे लागेल.’
‘आम्ही संपूर्ण ताकदीनिशी खेळतो. प्रत्येक खेळाडूवर विश्वास आहे. प्रत्येकाच्या प्रतिभेचा लाभ होतो. चेंडू दोन्हीकडे वळत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, याची कल्पना होती. संघाचे क्षेत्ररक्षण किती दमदार होते. क्षेत्ररक्षणात प्रत्येकाने मेहनत घेतल्यामुळे कठीण झेल घेणेदेखील सोपे झाले.’
मुंबई इंडियन्सचे सर्वाधिक षटकार
मुंबई 1156
आरसीबी 1152
पंजाब 1008
चेन्नई 1006
कोलकाता 962
दिल्ली 921
राजस्थान 936
सनरायजर्स 551