आयपीएलच्या मोसमातील (IPL 2020) पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभव पत्करावा लागला. मात्र कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) विरुद्ध मोठ्या विजयाची नोंद करत मुंबईनं थेट क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. मुंबईनं कोलकात्याचा ४९ धावांनी पराभव केला. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवची फटकेबाजी आणि सर्वच गोलंदाजांची अचूक कामगिरी मुंबईच्या विजयाचं वैशिष्ट्यं ठरली.
चहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला
चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईचं क्षेत्ररक्षण फारचं चांगलं नव्हतं. त्या तुलनेत काल मुंबईच्या खेळाडूंनी दर्जा उंचावला. कोलकात्याच्या इयन मॉर्गननं मारलेला फटका रोखण्यासाठी उडी मारली नाही म्हणून हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराहवर संतापल्याच पाहायला मिळालं. १२ व्या षटकात हा प्रकार घडला.
धोनीला आणखी एक धक्का; ‘हा’ स्टार फलंदाज तिसऱ्या सामन्यालाही मुकणार१२ व्या षटकाचा पहिला चेंडू किएरॉन पोलार्ड संथ गतीनं टाकला. मॉर्गननं बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला फटका मारला. बुमराहनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तो रोखता आला नाही. त्यामुळे चेंडू थर्ड मॅनच्या दिशेनं गेला. वेगानं आलेल्या
हार्दिक पांड्यानं चेंडू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्याला चेंडू रोखता आला नाही.
पांड्यानं पायानं चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही चौकार गेल्यानं पांड्या बुमराहवर संतापला. चेंडू रोखण्यासाठी सूर मारायला हवा होतास, असं पांड्या रागानं बुमराहला सांगत असल्याचं दिसत होतं. यानंतर सोशल मीडियावर या घटनेची बरीच चर्चा झाली.