IPL 2020: Chahal went to take a spin of Virat and came back with a sneer, see exactly what happened | IPL 2020 : चहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला

IPL 2020 : चहल विराटची फिरकी घ्यायला गेला आणि स्वत:ची फजिती करून आला, नेमका काय प्रकार घडला

ठळक मुद्देयुझवेंद्र चहलने थेट विराट कोहलीलाच केलं ट्रोल ‘’विराट भैया तू माझा शॉर्टस का घातला आहेस’’, असा प्रश्न विचारत चहलने विराटची फिरकी घ्यायचा प्रयत्न केलाविराट म्हणाला, मी तुझा शॉर्ट्स वापरतो कारण तू ती कधीच वापरत नाहीस

अबुधाबी - सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दणदणीत विजय मिळवून दिली होता. युझी चहलने केलेल्या या कामगिरीमुळे संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्यावर सध्या भलताच खूश आहे. दरम्यान, या खेळीमेळीच्या वातावरणात चक्क चहलने एका गोष्टीवरून थेट विराट कोहलीलाच ट्रोल करण्याची हिंमत केली.

त्याचं झालं असं की, फिटनेसच्या बाबतीत विराट कोहली बरीच काळजी घेत असतो. तसेच आपल्या वर्कआऊटचे फोटो तो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, विराटने आपल्या वर्कआऊटचा फोटो इन्टाग्रामवर शेअर केला होता. तसेच त्याखाली कमेंट्स केली होती. त्यानंतर युझवेंद्र चहलला विराटची फिरकी घ्यायची लहर आली. लहान शॉर्ट्स घालून व्यायाम करत असलेल्या विराट कोहलीला ‘’विराट भैया तू माझा शॉर्टस का घातला आहेस’’, असा प्रश्न विचारत चहलने त्याची फिरकी घ्यायचा प्रयत्न केला. 

त्यावर विराटनेही तेवढेच तडाखेबंद उत्तर देत चहलची बोलती बंद केली. माझा शॉर्ट्स का घातला आहेस अशी विचारणा करणाऱ्या चहलला विराट म्हणाला की, मी तुझा शॉर्ट्स वापरतो कारण तू ती कधीच वापरत नाहीस. विराटच्या या उत्तरानंतर मात्र चहलने विराटला प्रतिप्रश्न केला नाही. 

दरम्यान, हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय मिळवून हंगामाची विजयी सुरुवात करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर मात केली होती. आता आज होणाऱ्या लढतीत बंगळुरूची गाठ किंग्स इलेव्हन पंजाबशी पडणार आहे. या लढतीतही बंगळुरूला चहलकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा असेल.

English summary :
Yuzvendra Chahal trolled Virat Kohli directly, Kohli replied Sharply

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020: Chahal went to take a spin of Virat and came back with a sneer, see exactly what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.