इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) मोसमाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. यंदाच्या आयपीएलचा कालावधी वाढला असून डबल हेडर सामन्यांची संख्या 6 वर मर्यादित ठेवण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये असे बरेच प्रयोग पाहायला मिळणार आहेत. आयपीएलनं गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्स संघानं केलेली मागणी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने मान्य केली आहे. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच हा प्रयोग होताना दिसणार आहे.
इंडियन प्रीमिअर लीग 2020चं अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर होणार आहे. 17 मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. बाद फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर करणार असून अंतिम सामना 24 मे रोजी होणार आहे. गतवर्षी ही स्पर्धा 44 दिवसांत झाली होती, परंतु यंदा 50 दिवस ही स्पर्धा चालणार आहे.
आयपीएल यंदा पूर्वांचल भारतातही होणार आहे. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या घरचे सामने गुवाहाटी येथील बर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात यावे अशी विनंती केली होती. ती आज आयपीएलने मान्य केली आणि राजस्थान रॉयल्स आता 5 व 9 एप्रिलला अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरुद्ध येथे खेळणार आहेत. हे दोन्ही सामने रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहेत.
राजस्थान रॉयल्स - अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोम्रो, मनन वोहरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटीया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, स्टीव्हन स्मिथ, वरुण अॅरोन, रॉबीन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हीड मिलर, ओशाने थॉमस, अनिरुद्ध अशोक जोशी, टॉम कुरण, अँड्रे टे.