आला रे आला... मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजानं सरावात तोडले स्टम्प्स; Video पाहून प्रतिस्पर्धींमध्ये धडकी

IPL 2020 : Guess who did this? मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019 अशी चार जेतेपद नावावर केली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 07:51 PM2020-09-12T19:51:48+5:302020-09-12T19:53:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Guess who did this? Clean Boult! Trent has arrived, Mumbai Indians share Trent Bowling Video | आला रे आला... मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजानं सरावात तोडले स्टम्प्स; Video पाहून प्रतिस्पर्धींमध्ये धडकी

आला रे आला... मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजानं सरावात तोडले स्टम्प्स; Video पाहून प्रतिस्पर्धींमध्ये धडकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017 आणि 2019 अशी चार जेतेपद नावावर केली आहेत. 19 सप्टेंबरला अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स ( MI) मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना करण्यासाठी उतरणार आहे

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाच्या पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) भिडणार आहेत. पाचव्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स ( MI) सज्ज आहे. अन्य फ्रँचायझींप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या ( MI) खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. त्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) उत्तुंग फटके मारताना पाहयाला मिळाला आहे. MIचे गोलंदाजही मागे नाहीत, शनिवारी तर त्यांच्या एका गोलंदाजानं चक्क स्टम्प्सचे दोन तुकडे केले आणि हा व्हिडीओ पाहून प्रतिस्पर्धींच्या मनात नक्की धडकी भरली असेल. 

7 Days To Go : IPL मधील महेंद्रसिंग धोनीचे हे 'सात' विक्रम तुम्हाला चक्रावून टाकतील!

IPL Auction 2020त मुंबई इंडियन्सनं त्यांच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज ख्रिस लीन ( Chris Lynn) याला दाखल करून घेतले. त्यामुळे मुंबई इंडियन्सची ( MI) सलामीचा ताकद वाढली आहे. ख्रिस लीनच्या जोडीला दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक/फलंदाज क्विंटन डी'कॉक हा आणखी एक तगडा पर्याय संघासमोर आहे. डी'कॉक आणि लीन हे सलामीला आल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येता येईल. सुर्यकुमार यादव आणि इशान किशन हे चौथ्या स्थानासाठी दोन सक्षम पर्याय मुंबईकडे आहेत. त्यांच्या जोडीला हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या हेही आहेत.

फिरकीत कृणाल ( Krunal Pandya) आणि राहुल चहर ही ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज मुंबईकडे आहेत.  राहुल चहर आणि कृणाल पांड्या हे दोन फिरकीपटू संघात आहे आणि ही दोघं प्रतिस्पर्धींच्या धावांवर लगाम लावण्यात सक्षम आहेत. लसिथ मलिंगानं माघार घेतल्यानंतर MIकडे जसप्रीत बुमराह हाच तगडा जलदगती गोलंदाज आहे. ट्रेंट बोल्ट हा पर्याय आहे, परंतु IPLमध्ये त्यानं 8.78च्या इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी केली आहे. नॅथन कोल्टर नील मागील दोन पर्वात खेळलेला नाही. पण, ट्रेंट बोल्ट चांगल्या फॉर्मात दिसत आहे. शनिवारी त्यानं कसून सराव केला आणि सरावात त्यानं स्टम्प्स उडवलाच शिवाय त्याच्या माऱ्याचा वेग एवढा होती की स्टम्प्सचे दोन तुकडे झाले.


बोल्टनं आयपीएलमध्ये 33 सामन्यांत 38 विकेट्स घेतले आहेत. 

पाहा व्हिडीओ...


मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान. 

"MS Dhoni नव्हे वीरू होता CSKच्या कर्णधारपदासाठी पहिला दावेदार, परंतु..."

CPL 2020चे जेतेपद पटकावून 'तो' IPL 2020 गाजवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालाय

राजस्थान रॉयल्स 2008चा मॅजिक IPL 2020तही दाखवणार; स्टीव्ह स्मिथ इतिहास रचणार?   

अरेरे... चेंडू आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पोहोचला थेट पार्किंगमध्ये, Video

Web Title: IPL 2020 : Guess who did this? Clean Boult! Trent has arrived, Mumbai Indians share Trent Bowling Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.