"MS Dhoni नव्हे वीरू होता CSKच्या कर्णधारपदासाठी पहिला दावेदार, परंतु..."

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( Indian Premier League) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 05:20 PM2020-09-12T17:20:22+5:302020-09-12T17:21:06+5:30

whatsapp join usJoin us
'CSK wanted Virender Sehwag as their captain but...,' Former player reveals how MS Dhoni joined Super Kings | "MS Dhoni नव्हे वीरू होता CSKच्या कर्णधारपदासाठी पहिला दावेदार, परंतु..."

"MS Dhoni नव्हे वीरू होता CSKच्या कर्णधारपदासाठी पहिला दावेदार, परंतु..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( Indian Premier League) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो. चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) त्यानं तीन जेतेपद जिंकून दिली. त्याच्या नेतृत्वाखाली CSKनं आठवेळा आयपीएल फायनलमध्ये धडक मारली आणि प्रत्येक पर्वात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा तो एकमेव संघ आहे. पण, CSKची कर्णधार म्हणून पहिली पसंती वीरेंद्र सेहवाग ( Virendre Sehwag) होता आणि त्यांची रणनिती यशस्वी ठरली असती, तर धोनीच्या जागी वीरूच CSKचा कर्णधार म्हणून दिसला असता.

CPL 2020चे जेतेपद पटकावून 'तो' IPL 2020 गाजवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालाय

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी फलंदाज सुब्रमणीयम बद्रीनाथ यानं हे रहस्य उलगडले. एऩ श्रीनिवासन यांनीही सेहवागला CSKच्या ताफ्यात घ्यायचे होते, असे सांगितले होते. सेहवागनं तेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत (Delhi Daredevils ) राहणे पसंत केलं. ''2008मध्ये आयपीएलला सुरुवात झाली आणि चेन्नई सुपर किंग्सने वीरेंद्र सेहवागची निवड करण्याचे ठरवले होते. मात्र, सेहवागनं दिल्लीची निवड केली,''असे बद्रीनाथने सांगितले.

राजस्थान रॉयल्स 2008चा मॅजिक IPL 2020तही दाखवणार; स्टीव्ह स्मिथ इतिहास रचणार?   

अरेरे... चेंडू आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पोहोचला थेट पार्किंगमध्ये, Video

त्याने पुढे सांगितले,''मॅनेजमेंटनंही त्याचं म्हणणं मान्य केलं. त्यानंतर होणाऱ्या लिलावापूर्वी चांगल्या खेळाडूचा शोध सुरू झाला. त्याआधी 2007चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतानं जिंकला आणि तेव्हा धोनीला घेण्याचा निर्णय झाला.''

2008मध्ये धोनी महागडा खेळाडू ठरला. CSKनं त्याच्यासाठी 1.5 मिलियन डॉलर मोजले. धोनीच्या नेतृत्वाखाली CSKनं 2010, 2011 आणि 2018मध्ये जेतेपद पटकावलं. 2019मध्ये एका धावेनं त्यांना जेतेपदानं हुलकावणी दिली.

IPL 2020साठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings Team for IPL 2020)
चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings Players List (CSK) - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड,  इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन 

KKRनं मोठा डाव टाकला; CPL विजेत्या संघातील हूकमी खेळाडू IPL2020त खेळणार!

संपूर्ण वेळापत्रक ( Chennai Super Kings Time Table for IPL 2020)

19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
22 सप्टेंबर, मंगळवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह
25 सप्टेंबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स,  सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
2 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
4 ऑक्टोबर, रविवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
7 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
13 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 नोव्हेंबर, रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी

Web Title: 'CSK wanted Virender Sehwag as their captain but...,' Former player reveals how MS Dhoni joined Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.