Ayush Mhatre Scores Back To Back Centuries In SMAT 2025 : भारतीय अंडर- १९ संघाचा कर्णधार आणि CSK चा भविष्यातील स्टार आयुष म्हात्रे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार खेळीसह लक्षवेधी चेहरा ठरताना दिसतोय. देशांतर्गत स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठीत असलेल्या सय्यद मुश्ताक आली स्पर्धेत मुंबई संघाच्या डावाची सुरुवात करताना या पठ्ठ्यानं सलग दोन सामन्यात दोन शतके झळकावल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे दोन्ही वेळी तो नाबाद राहिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग दुसरे शतक! सूर्या दादाच्या साथीनं ९२ चेंडूत संपवली मॅच
लखनौच्या इकाना स्टेडियमवर आंध्र प्रदेश विरुद्धच्या सामन्यात आयुष्य म्हात्रेनं षटकार चौकारांची बरसात करत यंदाच्या हंगामातील सलग दुसरे शतक झळकावले. पहिल्यांदा फलंदाजी करताना आंध्र संघाने मुंबईसमोर १५९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयुष्य म्हात्रे आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं मुंबईच्या डावाची सुरुवात केली. अनुभवी अजिंक्य रहाणे स्वस्तात आटोपल्यावर आयुष म्हात्रेनं भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या साथीनं मॅच संपवली. आयुष म्हात्रेन या सामन्यात सलग दुसरे शतक झळवताना आयुष म्हात्रेनं ५९ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १७६.२७ च्या सरासरीसह १०४ धावा कुटल्या. सूर्यकुमार यादवनं २१ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावांची खेळी साकारली.
त्यानं मुंबईकडून केलेला धमाका CSK ला मोठा दिलासा देणाराच, कारण...
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाने रेल्वेविरुद्धच्या लढतीनं सुरुवात केली. पहिल्या सामन्यात १८ वर्षीय आयुष म्हात्रे फक्त १८ धावांवर बाद झाला होता. पण त्यानंतर विदर्भ विरुद्धच्या लढतीत त्याने ५३ चेंडूत ११० धावांची धमाकेदार खेळी केली. सलग दुसऱ्या शतकासह त्याने २ सामन्यात नाबाद २१४ धावांसह यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईच्या संघाकडून त्याने केलेली ही कामगिरी चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठा दिलासा देणारी आहे. कारण गत हंगामात 'वाइल्ड कार्ड'सह CSK च्या ताफ्यात एन्ट्री मारल्यावर तो CSK चं उज्वल भविष्य असल्याचे मानले जात आहे.