India's tour of Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जवळपास निश्चित, जाणून घ्या टीम इंडियाचे नेतृत्व कोणाच्या खांद्यावर!

India's tour of Sri Lanka : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार असताना बीसीसीआयनं जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्याची घोषणा केलीय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:05 AM2021-05-11T11:05:24+5:302021-05-11T11:11:52+5:30

whatsapp join usJoin us
India's tour of Sri Lanka : Schedule, Venue For Three ODIs, Three T20Is in July, know probable team India | India's tour of Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जवळपास निश्चित, जाणून घ्या टीम इंडियाचे नेतृत्व कोणाच्या खांद्यावर!

India's tour of Sri Lanka : भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जवळपास निश्चित, जाणून घ्या टीम इंडियाचे नेतृत्व कोणाच्या खांद्यावर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार असताना बीसीसीआयनं जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्याची घोषणा केलीय. विराट, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आदी प्रमुख खेळाडू लंडनमध्ये असताना लंकन दौऱ्यासाठी बीसीसीआयनं प्लान बी तयार ठेवला आहे. ज्या खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेली नाही, त्या खेळाडूंना लंकन दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. अशात टीम इंडियाचे नेतृत्व कोण करेल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. श्रीलंका दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामने खेळवले जातील, हे आता स्पष्ट झाले आहे. ( India are set to play three ODIs and three T20Is in Sri Lanka in July) 

कधी व कुठे होतील सामने?

  • वन डे मालिका - १३ जुलै, १६ जुलै व १९ जुलै
  • ट्वेंटी-२० मालिका - २२ जुलै, २४ जुलै व २७ जुलै
  • सर्व सामने कोलंबो येथे खेळवण्यात येतील.

भारताचा संघ ५ जुलैला श्रीलंकेत दाखल होईल आणि २८ जुलैला मायदेशात परतेल. भारतीय खेळाडूंना दोन भागात क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. श्रीलंकेत दाखल होताच तीन दिवसांचा सक्तीचं क्वारंटाईन असेल, तर चार दिवस नियमांचं पालन करून खेळाडूंना सराव करता येईल.   २४ जणांना मिळालंय इंग्लंड दौऱ्याचं तिकीट, पण यातील किती जणं बसणार विमानात?; BCCI च्या नियमानं खेळाडू टेंशनमध्ये

कोणाला मिळेल संधी - शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, पृथ्वी शॉस दीपक चहर, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्थी, राहुल टेवाटिया. 

कर्णधारपदासाठी शिखर धवन हे नाव पुढे येत असले तरी पृथ्वी शॉही शर्यतीत आहे. भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, अनेक स्टार खेळाडू दिले अन् आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर विराजमान होणार!

Web Title: India's tour of Sri Lanka : Schedule, Venue For Three ODIs, Three T20Is in July, know probable team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.