India Tour of England: २४ जणांना मिळालंय इंग्लंड दौऱ्याचं तिकीट, पण यातील किती जणं बसणार विमानात?; BCCI च्या नियमानं खेळाडू टेंशनमध्ये

India Tour of England – BCCI Warns Players: या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना मुंबईत एकत्र येण्यास सांगितले आहे. तेथे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:24 AM2021-05-11T10:24:48+5:302021-05-11T10:30:41+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of England: BCCI warns players, ‘consider your tour over if you test Covid-19 positive’ | India Tour of England: २४ जणांना मिळालंय इंग्लंड दौऱ्याचं तिकीट, पण यातील किती जणं बसणार विमानात?; BCCI च्या नियमानं खेळाडू टेंशनमध्ये

India Tour of England: २४ जणांना मिळालंय इंग्लंड दौऱ्याचं तिकीट, पण यातील किती जणं बसणार विमानात?; BCCI च्या नियमानं खेळाडू टेंशनमध्ये

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज१८ ते २३ जून या कालावधीत न्यूझीलंडविरुद्ध होणार कसोटी वर्ल्ड कप फायनल

India Tour of England – BCCI Warns Players: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) काही दिवसांपूर्वी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेसाठी ४ राखीव खेळाडू अन्  २० जणांच्या संघाची घोषणा केली. यामध्ये हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, आदी काही नावं दिसली नाहीत. पण, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार ज्या खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंनाही विमानात बसता येणार आहे की नाही, हेही नक्की नाही. त्यामागे बीसीसीआयनं जाहीर केलेला नवा फतवा आहे.  भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, अनेक स्टार खेळाडू दिले अन् आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर विराजमान होणार!

या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना मुंबईत एकत्र येण्यास सांगितले आहे. तेथे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल अन् त्यात एखाद्या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यानं इंग्लंडला जाण्याचा विचारच सोडून द्यावा, असा आदेश बीसीसीआयनं दिला आहे. ( BCCI  has warned its England-bound players that if they test positive after landing in Mumbai, they can consider themselves out of the trip). ''इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंना मुंबईत दाखल होण्यास सांगितले आहे. त्यात कोणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास,  त्याच्यासाठी विशेष चार्टर्ड विमानाची सोय करणार नाही, असे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे,''अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू!

''खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे आणि मुंबई सोडण्यापूर्वी त्यांचे दोन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. लंडन दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी बायो बबल तयार करण्यात येणार आहे आणि त्यात सर्वजण सुरक्षित दाखव व्हावे, ही बीसीसीआय काळजी घेणार आहे. खेळाडूंना विमानानं किंवा कारनं मुंबईत दाखल होण्याची मुभा बीसीसीआयनं दिली आहे. तसेच सर्वांना कोव्हिशिल्ड लस घ्यावी असेही सांगण्यात आले आहे. (भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लंडला जाण्यापूर्वी घ्यावी लागेल फक्त कोव्हिशिल्डचीच लस; जाणून घ्या कारण) '' असेही सूत्राने सांगितले. भारतीय संघ २ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव;

लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर;

राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला. ( Team India WTC Plan : दोन टप्प्यांत १८ दिवसांचे क्वारंटाईन, खेळाडूंसह कुटुंबीयांनाही प्रवासाला परवानगी

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

१८ ते २३ जून - भारत विरुद्ध न्यूझीलंड ( जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल)
 

भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका

४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी
१२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी
२५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी
२ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी
१० ते १४ सप्टेंबर - पाचवी कसोटी

Web Title: India Tour of England: BCCI warns players, ‘consider your tour over if you test Covid-19 positive’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.