"आयपीएलनंतर भारतीय क्रिकेटपटूंना हवी मोठी विश्रांती, बायोबबलमुळे मानसिक थकवा जाणवतो"

Ravi Shastri News : बायोबबलमुळे फारच मानसिक थकवा जाणवत असल्याने यंदा आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना किमान दोन आठवड्यांची विश्रांती गरजेची असल्याचे मत  भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 05:42 AM2021-02-06T05:42:05+5:302021-02-06T05:43:26+5:30

whatsapp join usJoin us
"Indian cricketers need big rest after IPL, bio-bubble makes them feel mentally exhausted" | "आयपीएलनंतर भारतीय क्रिकेटपटूंना हवी मोठी विश्रांती, बायोबबलमुळे मानसिक थकवा जाणवतो"

"आयपीएलनंतर भारतीय क्रिकेटपटूंना हवी मोठी विश्रांती, बायोबबलमुळे मानसिक थकवा जाणवतो"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई : बायोबबलमुळे फारच मानसिक थकवा जाणवत असल्याने यंदा आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना किमान दोन आठवड्यांची विश्रांती गरजेची असल्याचे मत  भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुक्रवारी व्यक्त केले. भारतीयांना सप्टेंबरमध्ये यूएईत आयपीएल खेळावे लागले. आयपीएलनंतर लगेच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. विश्वकसोटी मालिकेच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी चढाओढ म्हणून भारत इंग्लंडविरुद्ध मालिका खेळत आहे. 
शास्त्री म्हणाले, ‘माझ्या मते खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काहीकाळ ब्रेक मिळायला हवा. इंग्लंडविरुद्ध मालिकेनंतर आमचे खेळाडू आयपीएल खेळतील. त्यानंतर त्यांना किमान दोन आठवडे विश्रांती मिळणे गरजेचे आहे. क्वारंटाईन, बायोबबल या गोष्टी मानसिक थकवा आणणाऱ्या आहेत. अखेर आपण सर्वजण माणसे आहोत.’
ऑस्ट्रेलियातील यशाविषयी शास्त्री म्हणाले, ‘मला सध्याच्या भारतीय संघाचा गर्व वाटतो. आम्ही एकावेळी एक पाऊल पुढे टाकू. प्रत्येक मालिका महत्त्वाची आहे. आमच्याकडे सर्व प्रकारात दमदार कामगिरी करणारी राखीव फळी आहे. त्यामुळे सर्वजण छाप पाडण्यास उत्सुक असतील.’

‘बॅण्ड बजाके आ गये उनका’!
लोकांची स्मरणशक्ती मर्यादित असते. ऑस्ट्रेलियात आम्ही २०१८ नंतर पुन्हा एकदा मालिका जिंकली. आम्ही मागच्यावेळी मालिका जिंकली तेव्हा लोक म्हणायचे, ‘ऑस्ट्रेलियाकडे (चेंडू कुतडल्याप्रकरणी निलंबित) स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नव्हते. यावेळी स्मिथ आणि वॉर्नर यांच्या उपस्थितीतही त्यांचा त्यांच्याच मैदानावर बॅण्ड वाजवून आलो आहोत. अनेक खेळाडूंच्या दुखापतीमुळे अकरा जणांचा संघ निवडणे कठीण झाले होते. चौथ्या कसोटीत तर फार कठीण स्थिती होती. कनक्शन नियमात नेट बॉलर कार्तिक त्यागी येऊ शकला असता तर त्यालादेखील खेळविले असते. विपरीत स्थितीत मिळविलेला मालिका विजय अनेक वर्षं स्मरणात राहणार आहे.’      - रवी शास्त्री, मुख्य कोच

Web Title: "Indian cricketers need big rest after IPL, bio-bubble makes them feel mentally exhausted"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.