Indian Cricket Team: Opportunity for Varun Chakraborty to tour Australia | Indian Cricket Team: साऊथच्या सिनेमात काम केलेल्या वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी

Indian Cricket Team: साऊथच्या सिनेमात काम केलेल्या वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी

ऑस्ट्रेलियाविरोधातील टी २० मालिकेसाठी भारतीय संघात निवडला गेलेल्या भारतीय फिरकीपटू वरूण चक्रवर्ती याने २०१४ मध्ये एका तामिळ सिनेमात काम देखील केले होते.  त्याने जीवा या सिनेमात एका क्रिकेटपटूचा छोटा रोल केला होता. तो एका क्रिकेट क्लबमध्ये हिरो मित्र म्हणून झळकला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला होता.

आयपीएल २०२० एकाच डावात पाच बळी घेणाºया वरूण याची निवड कुलदीप यादवच्या जागी झाली आहे. वरुण याने एक यष्टीरक्षक म्हणून शाळेच्या संघाकडून खेळ केला आहे. मात्र नंतर तो मध्यमगती गोलंदाजी करू लागला. त्यानंतर त्याने आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले.
या दरम्यान त्याला त्याचे पॅशन क्रिकेट कायमच खुणावत राहिले. त्यानंतर तो एक मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने झिवा या तमिळ चित्रपटात एक छोटी भूमिका देखील केली आहे. त्यात मुख्य हिरोला क्रिकेट खेळण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो अशी कथा आहे. तामिळ बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला होता. तामिळनाडूच्या या फिरकीपटूने आतापर्यंत ११ सामन्यात १३ गडी बाद केले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Indian Cricket Team: Opportunity for Varun Chakraborty to tour Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.