Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर

भारतीय महिला संघाची उप कर्णधार स्मृती मानधना हिने छोट्याखानी खेळीसह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 22:07 IST2025-12-21T22:06:55+5:302025-12-21T22:07:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India Women vs Sri Lanka Women 1st T20I Vice Captain Smriti Mandhana Becomes 1st Indian And Only 2nd Player Ever To Complete 4000 Runs In Women's T20Is | Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर

Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर

Smriti Mandhana Becomes 1st Indian To Complete 4000 Runs In Women's T20Is : विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाची उप कर्णधार स्मृती मानधना हिने छोट्याखानी खेळीसह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  

WPL लिलावात अनसोल्ड; पण आता थेट टीम इंडियात एन्ट्री! कोण आहे Vaishnavi Sharma? जाणून घ्या सविस्तर

श्रीलंकेनं दिलेल्या १२२ धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. इनोका रणवीरा हिने २५ चेंडूत २५ धावांवर स्मृतीच्या खेळीला ब्रेक लावला. त्याआधी स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्य़े ४००० धावांचा टप्पा पार केला. भारताकडून हा पल्ला गाठणारी स्मृती मानधना पहिली बॅटर ठरली आहे. एवढेच नाहीतर महिला टी-२० क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठणारी ती दुसरी बॅटर आहे. स्मृतीशिवाय आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हिने ४७४८ धावा केल्या आहेत. 

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सचा रेकॉर्ड

१) सुझी बेट्स

  • सामने : १७८
  • स्ट्राइक रेट : १०९
  • धावा : ४,७४८

 

  • २) स्मृती मंधाना

 

  • सामने : १५५
  • स्ट्राइक रेट : १२४
  • धावा : ४,०००

 

३) हरमनप्रीत कौर

  • सामने : १८३
  • स्ट्राइक रेट : १०९
  • धावा : ३,६५४
     

४) चमारी अटापथ्थू

  • सामने : १४७
  • स्ट्राइक रेट : ११०
  • धावा : ३,४७३
     

५) सोफी डिव्हाईन

  • सामने : १४७
  • स्ट्राइक रेट : १२०
  • धावा : ३,४३७

Web Title : स्मृति मंधाना ने रचा इतिहास: 4000 टी20I रन बनाने वाली पहली भारतीय बल्लेबाज

Web Summary : स्मृति मंधाना ने विशाखापत्तनम में श्रीलंका के खिलाफ खेलते हुए महिला टी20 अंतरराष्ट्रीय में 4000 रन पूरे कर एक बड़ी उपलब्धि हासिल की। वे ऐसा करने वाली पहली भारतीय और दूसरी खिलाड़ी हैं। इस विशिष्ट क्लब में न्यूजीलैंड की सूजी बेट्स भी शामिल हैं।

Web Title : Smriti Mandhana sets record: First Indian batter to 4000 T20I runs.

Web Summary : Smriti Mandhana achieved a major milestone, becoming the first Indian and second overall to score 4000 runs in Women's T20Is during the match against Sri Lanka in Visakhapatnam. She joins New Zealand's Suzie Bates in this elite club.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.