Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

जोडी नंबर वन! पण दोघींच्यात सातत्यपूर्ण खेळीसह ताळमेळाचाही दिसतोय अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:30 IST2025-09-14T16:22:16+5:302025-09-14T16:30:11+5:30

whatsapp join usJoin us
India Women vs Australia Women 1st ODI A Mix Up Ends With Smriti Mandhana Gesticulating At Pratika Rawal And Run Out By Phoebe Litchfield | Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Women vs Australia Women 1st ODI, Smriti Mandhana  Run Out : महिला वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकेसाठी मैदानात उतरला आहे. हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या सलामी जोडीनं सार्थ ठरवला. स्मृती मानधना अन् प्रतिका रावल जोडी जमली अन् दोघींची पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत यंदाच्या वर्ल्ड कपस्पर्धेसाठी तयार आहोत, असे संकेत दिले. ही जोडी फोडणं ऑस्ट्रेलियासाठी मुश्किल झालं होतं. पण सेट झाल्यावर दोघींच्यातील ताळमेळाचा अभाव दिसला अन् स्मृती मानधनाच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शतकी भागीदारीनंतर फुटली जोडी!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघाला दमदार सुरुवात करुन देताना स्मृती मानधना आणि प्रतिका रावल दोघींनी अर्धशतक साजरे केले. सध्याच्या घडीला महिला वनडे क्रिकेटमधील ही नंबर वनची जोडी आहे. पण संघाच्या धावफलकावर ११४ धावा असताना दोघींच्यात ताळमेळाचा अभाव दिसला. प्रतिका रावल धाव घेण्यासाठी नकार देत असताना स्मृती मानधना क्रीज सोडून फसली. डोकेदुखी वाढवणाऱ्या जोडी फोडण्याची संधी मिळताच फीबी लिचफिल्ड (Phoebe Litchfield) हिने डायरेक्ट थ्रो मारत स्मृतीच्या खेळीला ५८ धावांवर ब्रेक लावला. हातवारे करत प्रतिकावर नाराजी व्यक्त  स्मृतीनं पॅव्हेलियनचा रस्ता धरल्याचे पाहायला मिळाले.  

टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?

जोडी जबरदस्त, पण ताळमेळाचा दिसतोय अभाव

स्मृती मानधना आणि प्रतिका रावल ही महिला वनडेतील सर्वात यशस्वी सलामी जोडी ठरतीये. १५ डावात दोघींनी ८० पेक्षा अधिकच्या सरासरीनं हजारहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडची ॲटकिन्स आणि टेलर ही जोडी ६८.८३ च्या सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्मृती अन् प्रतिका दोघी  सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. पण या दरम्यान दोघींच्यात ताळमेळाचा अभावही दिसून आलाय. प्रतिकासोबत जोडी जमण्याआधी स्मृती मानधना ८१ सामन्यात फक्त २ वेळा रनआउट झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतिकासोबत जोडी जमल्यावर १५ डावात तीन वेळा स्मृती मानधना रनआउट झालीये. तिन्ही वेळा दोघींमध्ये ताळमेळाचा अभाव दिसून आलाय.

Web Title: India Women vs Australia Women 1st ODI A Mix Up Ends With Smriti Mandhana Gesticulating At Pratika Rawal And Run Out By Phoebe Litchfield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.