ठळक मुद्देभारतानं पहिल्या सामन्यात 6 विकेट्स राखून विजय मिळवलाविराट कोहलीच्या नाबाद 94, तर लोकेश राहुलच्या 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळीतीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात विराटची खेळी अविस्मरणीय ठरलीय, शिवाय त्यानं विजयानंतर केलेलं सेलिब्रेशनही सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले. विजय मिळवल्यानंतर विराटनं अनोखं सेलिब्रेशन केलं. विराटच्या या सेलिब्रेशननंतर सोशल मीडियावर चांगलाच धुरळा उडाला. सामन्यानंतर भारताच्या विजयापेक्षा विराटच्या सेलिब्रेशनचीच चर्चा रंगली आणि त्यात बीग बी अमिताभ बच्चन यांनीही एट्री घेतली. त्यांनी ट्विट करत प्रतिस्पर्धी संघाला वडीलकीचा सल्ला दिला. कोहलीला त्यांचा हा सल्ला फार आवडला.
वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 207 धावा केल्या. एव्हिन लुईसनं 17 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 40 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेंडन किंग ( 31), शिमरोन हेटमायर ( 56) आणि किरॉन पोलार्ड ( 37) यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनही 9 चेंडूंत 24 धावा चोपल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला. 
त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (8) लगेच माघारी परतला. पण, राहुल व विराट यांनी शतकी भागीदारी केली. राहुलनं 40 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 62 धावा केल्या. त्यानंतर विराटनं सर्व सूत्र आपल्या हाती घेताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 50 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 94 धावा चोपल्या. 
या सामन्यात विराटनं अजब सेलिब्रेशन केलं. पाहा व्हिडीओ...
अमिताभ बच्चन यांनी त्यानंतर ट्विट केलं की... 
![]()
![]()