भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला. रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. दुसऱ्या दिवशी अजिंक्यनेही 11 वे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर रोहितनं 150 धावांचा पल्ला ओलांडला. या कामगिरीसह रोहितनं आफ्रिकेची शिकार केली. 

पण, अजिंक्य बाद झाला अन् या जोडीची विक्रमी घोडदौड थांबली. रहाणे 192 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार लगावत 115 धावा करून माघारी परतला. या जोडीनं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या भारतीय जोडीत तिसरे स्थान पटकावले. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेनं राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या ( 268 धावा, 2008 ) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ही जोडी हुकली. आफ्रिकेविरुद्ध मयांक अग्रवाल आमि रोहित शर्मा यांनी केलेली 317 धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे.  


भारताकडून चौथ्या विकेटसाठीही ही पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली. परंतु, संघाची अवस्था 3 बाद 40 किंवा त्याहून बिकट असताना चौथ्या विकेटने केलेली ही जगभरातली सहावी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विशेष म्हणजे अव्वल पाचमध्ये एकाही भारतीय जोडीचा समावेश नाही. 

Web Title: India vs South Africa, 3rd Test : Ajinkya Rahane & Rohit Sharma joint 6th highest for the 4th wkt after a pair has come in at 40/3 or worse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.