KL Rahul Drops A Straightforward Catch Aiden Markram Jasprit Bumrah Disappointed : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीच्या मैदानात रंगला आहे. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याची वेळ आल्यावर भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज दोघांनी अचूक टप्प्यावर मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीला दमवलं. एवढेच नाही तर जसप्रीत बुमराहनं परफेक्ट सेटअपसह एडन मार्करमनला आपल्या जाळ्यातही अडकवले. पण केएल राहुलनं मोठी चूक केली. स्लिपमध्ये अगदी साधा सोपा झेल सोडला अन्मा र्करमला जीवनदान मिळाले. ही चूक टीम इंडियासाठी महागात पडू शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१६ चेंडूचा सामना केल्यावर मार्करमनं चौकार मारत उघडले खाते
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून एडन मार्करम आणि रायन रिकल्टन जोडीनं पहिल्या डावाच्या खेळाला सुरुवात केली. सहाव्या षटकापर्यंत मार्करमनं १६ चेंडू खळून खातेही उघडले नव्हते. जसप्रीत बुमराह घेऊन आलेल्या सातव्या षटकार चौकराच्या मदतीने त्याने खाते उघडले.
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
बुमराहनं त्याचं काम केलं, पण KL राहुलनं कॅच सोडला अन्...
सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत परफेक्ट सेटअपसह जसप्रीत बुमराहने त्याला फसवलं. मार्करमच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये लोकेश राहुलकडे गेला. पण त्याने ही संधी दवडली. संघातील अनुभवी खेळाडूच्या चुकीनंतर जसप्रीत बुमराह हताश झाल्याचे पाहायला मिळाले.
सुरुवातीला खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात असताना अशी चूक करणं म्हणजे टीमला संकटात नेण्यासारखंच
गुवाहाटी येथील बारासपाराच्या स्टेडियमवरील खेळपट्टी पहिल्या दोन दिवसांच्या खेळात फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. ही गोष्ट लक्षात ठेवतच टेम्बा बावुमानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहनं कमालीची गोलंदाजी करत हा डाव दक्षिण आफ्रिकेवर उलटवण्याचा डाव खेळला. पण KL राहुलनं घोळ केला. आधीच नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं झुकला असताना केएल राहुलच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे.