भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी मजबूत पकड बनवली आहे. चहापानापर्यंत भारतीय संघाने 2 विकेट गमावत 168 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा आज अपयशी ठरला असला तरी मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना संघाला मजबूत स्थितित आणले. या दोघांनी भागीदारी आफ्रिकेच्या कागिसो रबाडानं संपुष्टात आणली. भारताचे दोन्ही फलंदाज रबाडानं माघारी पाठवले आणि या कामगिरीसह त्यानं जसप्रीत बुमराहचा एक विक्रम मोडला.
सामन्याच्या दहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रबाडानं रोहितला माघारी पाठवले. पहिल्या कसोटीत एकूण 303 धावा करणारा रोहित आज अवघ्या 14 धावांत माघारी परतला. पण, त्यानंतर आफ्रिकेला दुसऱ्या विकेटसाठी 163 धावांपर्यंत वाट पाहावी लागली. मयांक आणि चेतेश्वर या दोघांनाही आफ्रिकन क्षेत्ररक्षकांनी जीवदान दिले. रबाडाच्याच गोलंदाजीवर चेतेश्वर शून्यावर असताना झेल सुटला. त्यानंतर या दोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी 138 धावांची भागीदारी केली. चेतेश्वर 112 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकार खेचून 58 धावांत माघारी परतला. रबाडानं त्याला बाद केले.
या विकेटसह रबाडानं भारताच्या जसप्रीत बुमराहचा एक विक्रम मोडला. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूंत रबाडानं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 39 कसोटी सामन्यांत 39.8च्या स्ट्राईक रेटनं 179 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहनं 12 कसोटींत 43.7च्या स्ट्राईक रेटनं 62 विकेट्स घेतल्या आहेत.
मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर आदळला खतरनाक बाऊन्सर, Videoविराट कोहलीचं अर्धशतक; गांगुलीचा विक्रम मोडला
आफ्रिकेनं खेळला डाव, KKRच्या खेळाडूला उतरवले मैदानात
![]()