IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समदं ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!

चहापानाआधीच चौघे तंबूत; त्यात संघ अडचणीत असताना कर्णधार पंतचा अगाऊपणा

By सुशांत जाधव | Updated: November 24, 2025 11:50 IST2025-11-24T11:47:06+5:302025-11-24T11:50:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs South Africa 2nd Test Day 3 After KL Rahul Team India Lose 3 Wickets In 20 Balls Yashasvi Jaiswal Sai Sudharsan Dhruv Jurel Rishab Pant To Go 5 Down | IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समदं ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!

IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समदं ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!

India vs South Africa 2nd Test Day 3  Team India Lose 3 Wickets In 20 Balls : गुवाहाटीच्या मैदानात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने "आमची बॅटिंग अन् बॉलिंग समदं ओकेमध्ये हाय..." थाट दाखवून देत टीम इंडियाची वाट लावली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ४८९ धावा केल्यावर गोलंदाजीत धमक दाखवत चहापानापर्यंत टीम इंडियाची अवस्था ४ बाद १०२ धावा अशी बिकट केल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

KL राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का

भारतीय संघाने बिन बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. केशव महाराज याने लोकेश राहुलला पुन्हा आपली शिकार करत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्याने ६३ चेंडूचा सामना करताना २२ धावा केल्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याच्याकडून संयमी खेळीची अपेक्षा होती. पण केशव मराहाजसमोर त्याचा संयम कधी ढळला ते त्यालाही कळलं नाही.

यशस्वी जैस्वालनं अर्धशतक झळकावले, पण...

पहिल्या सामन्यात बाकावर बसवलेल्या साई सुदर्शन याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४० चेंडूचा सामना केला. पण तोही १५ धावा करून तंबूत परतला. यशस्वी जैस्वाल याने अर्धशतक झळकावत टीम इंडियाला दिलासा दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले अर्धशतक झळकावल्यावर त्याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. अर्धशती खेळी साकारल्यावर मोठी खेळी करण्यात तो माहिर आहे. पण यावेळी त्याचा तो तोरा दिसला नाही. सायमन हार्मरच्या गोलंदाजीवर तो फसला. त्याने ५८ धावांची खेळी केली. ध्रुव जुरेल याने नको त्या वेळी मोठा फटका मारण्याच्या नादात एकही धाव न करता तंबूचा रस्ता धरला.  लोकेश राहुलच्या रुपात पहिला धक्का बसल्यावर भारतीय संघाने चहापानाआधी २० चेंडूत ३ विकेट्स गमावल्या. 

India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी

रिषभ पंतच्या विकेटसह टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत

चहापानानंतर कर्णधार रिषभ पंतनंही मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारून खाते उघडणारा पंत ७ धावांची भर घालून माघारी फिरला. परिणामी गुवाहाटीचा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडण्याचं आव्हान असलेल्या भारतीय संघावर आता फॉलोऑन टाळण्याचं संकट घोंगावत आहे.   

Web Title : गुवाहाटी टेस्ट में दक्षिण अफ्रीका का दबदबा; भारत का बल्लेबाजी क्रम चरमराया

Web Summary : गुवाहाटी टेस्ट में दक्षिण अफ्रीका की मजबूत बल्लेबाजी और गेंदबाजी ने भारत को मुश्किल में डाल दिया। जायसवाल के अर्धशतक के बावजूद, भारत ने जल्दी विकेट खो दिए, पंत के आउट होने से उनकी मुश्किलें और बढ़ गईं। भारत पर अब फॉलोऑन का खतरा मंडरा रहा है।

Web Title : South Africa Dominates India in Guwahati Test; India's Batting Collapses

Web Summary : South Africa's strong batting and bowling put India in a tough spot in the Guwahati Test. Despite Jaiswal's fifty, India lost wickets quickly, with Pant's dismissal adding to their woes. India now faces a follow-on threat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.