भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट दूर झाले आहे. पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत होणार आहे. भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारताला 203 धावांनी विजय मिळवून दिला.
04:51 PM
पहिल्या दिवसअखेर भारताच्या 273 धावा
02:04 PM
मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा यांची 138 धावांची भागीदारी कागिसो रबाडानं संपुष्टात आणली. 112 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकार खेचून 58 धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला त्यानं बाद केलं,
01:49 PM
मयांक-पुजाराची शतकी भागीदारी

12:06 PM
रबाडाच्या गोलंदाजीवर पहिल्या ड्रिंक ब्रेकपूर्वीच तो माघारी परतला. दहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर तो फसला. मिडल आणि ऑफ स्टंपवर पडलेला हा सुंदर चेंडू बाहेर जात असताना तो सोडून देण्याच्या प्रयत्नात रोहितच्या बॅटची कड घेऊन तो यष्टीरक्षक कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. रबाडाने टाकलेल्या पुढच्याच षटकातील म्हणजे १२ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पुजारा बाद होता होता वाचला.पुजाराने अतिशय सावध प्रारंभ केला. खाते उघडण्यासाठी त्याला १३ व्या चेंडूपर्यंत वाट बघावी लागली. नंतरही त्याने आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीला सन्मान दिला. दुसरीकडे, मयांक अग्रवालने पदार्पणवीर वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्जेच्या एकाच षटकात ३ चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. २०व्या षटकात फिरकीपटू केशव महाराज गोलंदाजीला येताच पुजाराने आपले हात मोकळे केले. या षटकात त्याने मिड विकेट आणि मिड ऑनच्या क्षेत्रात सलग २ चौकार लगावले. उपाहारापूर्वीच्या षटकात पुजाराने रबाडा चौकार मारत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली. उपाहारापर्यंत भारताने २५ षटकांत १ बाद ७७ धावा केल्या होत्या.
09:06 AM
भारतीय संघात एक बदल
मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धीमान सहा, आर अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी