India vs South Africa, 1st T20I: These Players Get Chance For First Twenty20 Match | India vs South Africa, 1st T20I: पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
India vs South Africa, 1st T20I: पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी

धर्मशाला: भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याला आज (रविवार) पासून सुरुवात होत आहे. धर्मशाला येथे पहिला ट्वेंटी-20सामना खेळवण्यात येणार असून वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच 2020मध्ये होणाऱ्या  ट्वेंटी- 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी असणार आहे.

पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात रोहित शर्मासह शिखर धवनला सलामी फलंदाजी करण्याची संधी दिली जाऊ शकते, कारण धवनला वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी करण्यात अपयथ आले होते. मात्र भारत अ विरुद्ध दक्षिण अफ्रिका अ संघाच्या सामन्यात धवनने दोन सामन्यात अर्धशतक झळकाविले होते. तसेच विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर, श्रेयस अय्यर किंवा मनीष पांडे या दोघांपैकी एकाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन झाल्याने भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे.  विकेटकीपर ऋषभ पंतचे स्थान कायम राहू शकते. तर कृणाल पांड्या आणि रवींद्र जडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाजीमध्ये नवदीप सैनी, खलील अहमद आणि दीपक चाहर यांच्यापैकी एकाला संघात संधी मिळू शकते.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात विक्रमासाठी चढाओढ सुरू होणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार कोहलीला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. रोहित 53 धावांच्या आघाडीसह अव्वल स्थानावर आहे. कोहलीला या विक्रमात रोहितला मागे टाकण्याची संधी आहे. रोहितनं 88 डावांत 2422 धावा केल्या आहेत, तर कोहलीच्या नावे 65 डावांत 2369 धावा आहेत. दुसरीकडे रोहितला कोहलीच्या एका विक्रमाच्या जवळ जाण्याची संधी आहे.

तसेच धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. हवामान खात्याने सांगितले की, पुढील पाच दिवसात हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची दाट शक्यता असून आज होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

संभाव्य संघ 

भारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी. 

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा  हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.

Web Title: India vs South Africa, 1st T20I: These Players Get Chance For First Twenty20 Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.