India vs South Africa, 1st T20I: पाऊस थांबल्यावर किती वेळात सुरु होऊ शकतो सामना, जाणून घ्या...

पाऊस थांबल्यावर किती वेळात सामना सुरु होऊ शकतो. या गोष्टीचे स्पष्टीकरण येथील क्युरेटर सुनील चौहान यांनी दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:44 PM2019-09-15T17:44:07+5:302019-09-15T17:44:21+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 1st T20I: How long it can start after match after rain stops | India vs South Africa, 1st T20I: पाऊस थांबल्यावर किती वेळात सुरु होऊ शकतो सामना, जाणून घ्या...

India vs South Africa, 1st T20I: पाऊस थांबल्यावर किती वेळात सुरु होऊ शकतो सामना, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

धर्मशाला, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. पण काही मिनिटांपूर्वीच इथे पाऊस पडला आहे. पण पाऊस थांबल्यावर किती वेळात सामना सुरु होऊ शकतो. या गोष्टीचे स्पष्टीकरण येथील क्युरेटर सुनील चौहान यांनी दिले आहे.

आज दुपारी चार वाजता येथे पाऊस पडला. पण त्यानंतर सामना सुरु व्हायला तीन तास होते. पण जर सामना सुरु होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पाऊस पडला किंवा सामना सुरु असताना पाऊस पडला तर किती मिनिटांमध्ये सामना पुन्हा सुररु होऊ शकतो, याबाबत चौहान यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

याबाबत चौहान म्हणाले की, " गेल्या तीन दिवसांपासून सतत इथे पाऊस पडत आहे. पण सामना खेळवण्यासाठी आम्ही सर्वतोपर प्रयत्न करत आहोत. आम्ही जवळपास सर्व मैदान झाकले आहे. पण मैदानाचा काही भाग झाकायचा राहिला आहे. जर पाऊस थांबला तर त्या भागातील पाणी आम्ही सुपर सोपरने काढू. त्यामुळे पाऊस थांबल्यावर अर्ध्या तासामध्ये आम्ही सामना पुन्हा सुरु करू शकतो."

काही मिनिटांपूर्वी पडला पाऊस, सामना होणार की नाही ते जाणून घ्या...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना धर्मशाला येथे काही तासांमध्ये सुरु होणार आहे. पण काही मिनिटांपूर्वीच धर्मशाला येथे पाऊस पडला आहे. त्यामुळे हा सामना खेळवायचा की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

धर्मशाला येथे गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील वातावरण थंड झाले आहे. त्याचबरोबर सतत पाऊस पडत असल्यामुळे वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरू शकते. त्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारेल, असे म्हटले जात आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याला आज (रविवार) पासून सुरुवात होत आहे. धर्मशाला येथे पहिला ट्वेंटी-20सामना खेळवण्यात येणार असून वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. तसेच आज देखील पावसाची शक्याता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हवामान खात्याने सांगितले की, पुढील पाच दिवसात हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची दाट शक्यता असून आज होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच बीसीसीआयने देखील शनिवारी एक फोटो ट्विट करत शेअर केला आहे. यामध्ये मैदानाजवळील भागात काळे ढग दाटून आल्याचे दिसते आहे.

संभाव्य संघ 

भारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी. 

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा  हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.

Web Title: India vs South Africa, 1st T20I: How long it can start after match after rain stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.