IND vs NZ,KL Rahul Break Virat Kohli Record Most Times Hitting Winning Six In Odis : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना रोमहर्षक झाला. अखेरच्या षटकात क्लास आपला दाखवत लोकेश राहुलनं षटकार मारत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या षटकारासह त्याने फक्त टीम इंडियाला सामना जिंकून दिला नाही तर खास विक्रमही आपल्या नावे केला. विशेष म्हणजे लोकेश राहुलनंविराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. वनडेत सर्वाधिक वेळा षटकार मारून मॅच फिनिश करण्यात तो किंग कोहलीच्या पुढे निघून गेला आहे. इथं जाणून घेऊया या खास रेकॉर्डसंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KL राहुलनं २१ चेंडूंत केल्या नाबाद २९ धावा
वडोदरा येथे झालेल्या भारत–न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३०० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेज मास्टर किंग कोहलीनं आणखी एक दमदार खेळी केली. पण तो बाद झाल्यावर सामन्यात ट्विस्ट आले. पण लोकेश राहुलनं 'मै हूँ ना...' शो दाखवत संघाचा विजय निश्चित केला. लोकेश राहुलनं सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत विकेटमागच्या जबाबदारीसह वनडेत फिनिशरच्या भूमिकेसाठीही सर्वोत्तम पर्याय असल्याचे दाखवून दिले.
IND vs NZ: एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच किंग; बलाढ्य संघांना जमलं नाही, ते करून दाखवलं!
वनडेत षटकार मारून भारताला ६ वेळा विजय मिळवून देणारा राहुल
वनडेत षटकार मारत सर्वाधिक वेळा भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या फलंदाजांच्या यादीत MS धोनी सर्वात आघाडीवर आहे. कॅप्टन कूल धोनीनं आपल्या कारकिर्दीत ९ वेळा सिक्सर मारून मॅच संपवल्याचा रेकॉर्ड आहे. या यादीत आता केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. सहाव्यांदा त्याने षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला. किंग कोहलीनं आतापर्यंत ५ वेळा अशी कामगिरी करुन दाखवली आहे. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
केएल राहुलला फक्त वनडे आणि कसोटीतच मिळतीये संधी
लोकेश राहुल हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी सर्वोत्तम खेळाडू आहे. पण सध्याच्या घडीला त्याला फक्त दोन प्रकारातच संधी मिळत आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कसोटीत त्याच्याकडे सलामीवीराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वनडेत विकेट किपर बॅटरच्या रुपात फिनिशरच्या भूमिकेत त्याच्यावर भरवसा दाखवण्यात येत आहे. वनडेतील त्याची कामगिरी पंतसाठी डोकेदुखी ठरू शकते.