India vs Bangladesh, 1st Test: 'Old habits die hard', Ravi Shastri's Twitter post triggers social media trolls again | India vs Bangladesh, 1st Test: रवी शास्त्रींनी पुन्हा केलं असं काही, नेटिझन्सला ट्रोल केल्यावाचून रहावलं नाही

India vs Bangladesh, 1st Test: रवी शास्त्रींनी पुन्हा केलं असं काही, नेटिझन्सला ट्रोल केल्यावाचून रहावलं नाही

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशनं सपशेल शरणागती पत्करली. बांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले. भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंजांनी सात विकेट्स घेतल्या. पण, भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सर्वांचे लक्ष वेधलं. 

यापूर्वी सामना सुरु असताना काढलेली झोप, त्यांचा पोटाचा घेर आदी अनेक कारणांनी शास्त्री ट्रोल झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालिंवर नेटिझन्स लक्ष ठेवूनच असतात. आताही तसेच घडले. सामन्याच्या सुरुवातीला शास्त्री यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्यात त्यांनी गोलंदाजी करतानाचा फोटो पोस्ट केला होता आणि त्यावर लिहिले होते की,''Old habits die hard''. शास्त्रींच्या या फोटोवर नेटिझन्स तुफान सुटले.


नेटिझन्सच्या प्रतिक्रीया
अश्विनचा विक्रम
या सामन्यापूर्वी घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी अश्विनला केवळ एक फलंदाज बाद करावा लागणार होता. मोमिनूलची विकेट घेत त्यानं तो पल्ला गाठला. घरच्या मैदानावर 250 कसोटी विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अनील कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी हा विक्रम केला आहे. घरच्या मैदानावर अनील कुंबळेच्या नावावर 350, तर हरभजन सिंगच्या नावावर 265 विकेट्स आहेत. त्यानंतर शमीनं बांगलादेशचा डाव गुंडाळला. बांगलादेशकडून मोमिनूल हक ( 37) आणि मुश्फिकर रहीम (43) यांनी संघर्ष केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Bangladesh, 1st Test: 'Old habits die hard', Ravi Shastri's Twitter post triggers social media trolls again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.