मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : वानखेडेवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच भारताच्य गोलंदाजांना धूळ चारत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. या दोघांनी या सामन्यात विश्वविक्रम रचला आणि संघाला विजयही मिळवून दिला.

वानखेडेवर भारताला या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. कारण ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताविरुद्ध सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी क्रिकेट विश्वातील एकाही देशाला भारताला एवढ्या मोठ्या फरकाने पराभूत करता आले नव्हते.

वॉर्नर आणि फिंच या जोडीने भारताविरुद्ध अभेद्य २५८ धावांची भागीदारी रचली. आतापर्यंत वानखेडेवर भारताविरुद्ध झालेली ही सर्वाधिक भागीदारी आहे. यापूर्वी ही गोष्ट न्यूझीलंडच्या रॉस टेलर आणि टॉन लॅथम यांन केली होती. या दोघांनी भारताविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर २०० धावांची भागीदारी रचली होती.

ऑस्ट्रेलियाचा भारताला जोरदार धक्का; सलामीवीरांनीच काढली भारताच्या गोलंदाजीची हवा
भारताला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार धक्का दिला. वानखेडेवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच भारताच्य गोलंदाजांना धूळ चारत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. या दोघांनी द्विशतकी भागीदारी रचत भारताच्या हातून सामना सहजपणे हिरावला. वॉर्नरने यावेळी चौकारासह आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील १८वे शतक ठरले.
कर्णधार फिंचनेही वॉर्नरला सुयोग्य साथ दिली आणि चौकारासह आपलेही शतक पूर्ण केले. फिंचनेही चौकारासह आपले अर्धशतक झळकावले.
ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच धू धू धुतले...
भारताच्या गोलंदाजांना पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी धू धू धुतल्याचे पाहायला मिळाले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया सलामीवीरांनी भारताच्या गोलंदाजीची हवा काढून टाकल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येचा चांगला पाया रचला होता. पण या दोघांनंतर एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांवर समाधान मानावे लागले.
भारताच्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच हे दोघे मैदानात उतरले. मैदानात उतरून या दोघांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी दीडशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला.