कपिल पाजींनी नारळ फोडला; MS धोनीसह किंग कोहलीनंही लॉर्ड्सच्या मैदानात जिंकून दिलाय सामना, आता...

आतापर्यंत टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानात किती सामने खेळले? कुणाच्या नेतृत्वाखाली मारलंय हे मैदान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:44 IST2025-07-09T13:39:54+5:302025-07-09T13:44:18+5:30

whatsapp join usJoin us
India Test Record At Lords Stats v England Since 1932 Team India Last Win Head To Head Shubman Gill Ben Stokes | कपिल पाजींनी नारळ फोडला; MS धोनीसह किंग कोहलीनंही लॉर्ड्सच्या मैदानात जिंकून दिलाय सामना, आता...

कपिल पाजींनी नारळ फोडला; MS धोनीसह किंग कोहलीनंही लॉर्ड्सच्या मैदानात जिंकून दिलाय सामना, आता...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England Test Record At Lord's London : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी रंगणाऱ्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. १० जुलै पासून क्रिकेटच्या पंढरीत रंगणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. एजबॅस्टनच्या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवल्यावर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर आता नवे आव्हान आहे. इथं एक नजर टाकुयात लॉर्ड्सच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड त्यासंदर्भातील सविस्तर माहिती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आतापर्यंत टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानात किती सामने खेळले?

क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघाने १९३२ मध्ये सीके नायडू यांच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाला१५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. आतापर्यंत भारतीय संघानं या मैदानात १९ कसोटी सामने खेळले असून यात १२ सामन्यातील पराभव अन्  ३ सामन्यातील विजयासह टीम इंडियाने ४ सामने अनिर्णित राखले आहेत.

टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!

कपिल पाजींच्या नेतृत्वाखाली जिंकला होता पहिला कसोटी सामना


लंडन येथील लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारतीय संघाने ५ जून १९८६ मध्ये पहिला कसोटी सामना जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडला ५ विकेट्सनी मात दिली होती. कपिल देव यांच्याशिवाय या सामन्यात चेतन शर्मा यांनी घेतलेल्या पाच विकेट्स आणि दिग्गज फिरकीपटू मनिंदर सिंग यांनी ३ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. 

अजिंक्यचं शतक अन् इशांत शर्माचा जलवा

लॉर्ड्सच्या मैदानात १९८६ मध्ये पहिला विजय नोंदवल्यावर दुसऱ्या विजयासाठी २०१४ पर्यंत प्रतिक्षा करावी लागली. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं इथं दुसरा विजय मिळवला. या सामन्यात अंजिक्य रहाणेच शतक आणि दुसऱ्या डावात मुरली विजय (९५ धावा), रवींद्र जडेजा (६८) आणि भुवनेश्वर कुमार (५२*) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर ईशांत शर्मानं ७ विकेट्स घेत सामन्यात मॅच विनिंग कामगिरी करून दाखवली होती. 

केएल राहुलची हिरोगिरी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२१ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात शेवटचा सामना जिंकला होता. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर ३९१ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो रूटनं नाबाद १८० धावांची खेळी केली होती. पण भारतीय संघाने हा सामना तब्बल १५५ धावांनी जिंकला होता.

शुबमन गिल या दिग्गजांच्या पक्तींत बसणार का?

शुबमन गिल पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. पहिल्या दोन सामन्यात नेतृत्वासह फलंदाजीतील कर्तृत्वाची झलक दाखवून दिल्यावर आता तो लॉर्ड्सचं मैदान मारत कपिल पाजी, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या माजी कर्णधारांच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

 

Web Title: India Test Record At Lords Stats v England Since 1932 Team India Last Win Head To Head Shubman Gill Ben Stokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.