INDIA A Kick off their tour of Australia in style; 15-year-old Shafali Verma blasts a 63-ball  | टीम इंडियाच्या फलंदाजांनी केली कांगारूंची धुलाई; 15 वर्षीय खेळाडूचे 63 चेंडूंत शतक
टीम इंडियाच्या फलंदाजांनी केली कांगारूंची धुलाई; 15 वर्षीय खेळाडूचे 63 चेंडूंत शतक

भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार सुरुवात केली. भारत अ संघानं पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. भारताच्या 15 वर्षीय शेफाली वर्मानं 63 चेंडूंत शतकी खेळी करताना भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. तिला कर्णधार वेदा कृष्णमुर्तीनंही शतक ठोकलं. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारत अ संघानं 16 धावांनी विजय मिळवला. 

प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी 9 बाद 312 धावा केल्या. प्रिया पुनिया ( 8) आणि दयालन हेमलथा ( 0) यांना अपयश आलं, परंतु शेफाली अन् वेदा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. शेफालीनं 63 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. तिनं एकूण 78 चेंडूंत 19 चौकार व 4 षटकार खेचून 124 धावा केल्या. वेदानं 99 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकार खेचून 113 धावा केल्या. पण, त्यानंतर अन्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करता न आल्यानं भारताला 312 धावांवर समाधान मानावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या तहलीया मॅक्ग्राथनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तिला बेलिंडा वकारेवा आणि हिदर ग्रॅहमनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 9 बाद 296 धावाच करता आल्या. कर्णधार ताहलीया मॅक्ग्राथनं 97 धावांची खेळी केली. तिनं 90 चेंडूंत 16 चौकार लगावले. अॅनाबेल सदरलँडनं 52 चेंडूंत 6 चौकारांसह 52 धावा केल्या. भारताच्या देविका वैद्यनं 55 धावांत 4 फलंदाज बाद केले. तिला दयालन हेमलथानं दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक - भारत अ - 9/312 ( शेफाली वर्मा 124, वेदा कृष्णमृर्ती 113; तहलीया मॅक्ग्राथ 3/48, बेलिंडा वकारेवा  2/50) वि. वि. ऑस्ट्रेलिया अ - 9 / 296 ( तहलीया मॅक्ग्राथ 97, अॅनाबेल सदरलँड 52; देविका वैद्य 4/55, दयालन हेमलथा 2/31). 

Web Title: INDIA A Kick off their tour of Australia in style; 15-year-old Shafali Verma blasts a 63-ball 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.