IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!

या विजयासह भारतीय महिला संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 21:59 IST2025-12-23T21:58:02+5:302025-12-23T21:59:26+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND W vs SL W Shafali Vermas blistering 69 Powers India to Big Win Against Sri Lanka Women Visakhapatnam in the 2nd T20I | IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!

IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!

IND W vs SL W Shafali Vermas Powers India To Big Win Against Sri Lanka Women In  2nd T20I :  वैष्णवी शर्मानं गोलंदाजी दाखवलेली चमक आणि धावांचा पाठलाग करताना शफाली वर्माची धमाकेदार नाबाद अर्धशतक याच्या जोरावर भारतीय संघाने विशाखापट्टमच्या मैदानात सलग दुसरा विजय नोंदवला आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने १२८ धावा करत भारतीय महिला संघासमोर १२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ विकेट राखून १२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवरच विजय निश्चित केला. या विजयासह भारतीय महिला संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

चांगल्या सुरुवातीनंतर स्मृतीनं स्वस्तात गमावली विकेट

श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या भारतीय जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. पण चांगली सुरुवात मिळाल्यावर स्मृती मानधना हिने दिलहारीच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. तिने ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४ धावांचे योगदान दिले. 

IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!

शफाली जेमिमा जोडी जमली 

स्मृतीची जागा घेण्यासाठी आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जनंही सुंदर फटकेबाजीचा नजराणा पेश केला. शफालीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी तिने २७ चेंडूत ५८ धावांची दमदार भागीदारी रचली. शफालीच्या जोडीनं ती पहिल्या मॅचप्रमाणे यावेळीही सामना जिंकूनच परतेल, असे वाटत होते. पण काविंदीनं तिच्या खेळीला ब्रेक लावला. तिने १५ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले.

शफाली वर्मानं २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटसह कुटल्या धावा

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं संघाला एका धावेची गरज असताना १० धावांवर बाद झाली. रिचानं एकेरी धाव घेत भारताचा विजय निश्चित केला. या सामन्यात शफाली वर्मानं ३४ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २०२.९४ च्या स्ट्राईक रेटनं ६९ धावांची नाबाद मॅच विनिंग खेळी केली. 

 


 

Web Title : IND W vs SL W: वर्मा का बल्ला चमका, भारत ने फिर श्रीलंका को हराया!

Web Summary : शफाली वर्मा के नाबाद अर्धशतक और वैष्णवी शर्मा की गेंदबाजी की बदौलत भारत ने दूसरे टी20 मैच में श्रीलंका को हराया। भारत ने 129 रनों के लक्ष्य को 7 विकेट शेष रहते हासिल कर सीरीज में 2-0 की बढ़त बना ली।

Web Title : India Women dominate Sri Lanka again, Verma shines in T20!

Web Summary : Shafali Verma's unbeaten fifty and Vaishnavi Sharma's bowling helped India secure a second consecutive victory against Sri Lanka in the 2nd T20I. India chased down the target of 129 with 7 wickets to spare, taking a 2-0 lead in the series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.