IND vs SL 2nd T20I : कृणाल पांड्याला कोरोना झालाच कसा?; टीम इंडियासाठी संपूर्ण हॉटेलच केलं होतं बुक, BCCI कन्फ्युज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:00 PM2021-07-27T21:00:58+5:302021-07-27T21:01:31+5:30

India Tour of Sri Lanka Krunal Pandya : बाबो बबल मोडल्याची कोणतीच घटना नाही, टीम इंडियासाठी संपूर्ण ताज समूद्रा हॉटेल बुक केलं, स्टाफची वारंवारी कोरोना चाचणी, तरीही कृणालला कोरोना झालाच कसा?

IND vs SL 2nd T20: Entire Taj Samudra booked for Team India, BCCI confused how Krunal Pandya tested COVID positive | IND vs SL 2nd T20I : कृणाल पांड्याला कोरोना झालाच कसा?; टीम इंडियासाठी संपूर्ण हॉटेलच केलं होतं बुक, BCCI कन्फ्युज!

IND vs SL 2nd T20I : कृणाल पांड्याला कोरोना झालाच कसा?; टीम इंडियासाठी संपूर्ण हॉटेलच केलं होतं बुक, BCCI कन्फ्युज!

Next
ठळक मुद्दे भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भारत-श्रीलंका संघातील सर्व खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामनाही स्थगित करावा लागला असून तो 28 जुलैला म्हणजेच उद्या खेळवण्यात येणार आहे.

India Tour of Sri Lanka : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भारत-श्रीलंका संघातील सर्व खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामनाही स्थगित करावा लागला असून तो 28 जुलैला म्हणजेच उद्या खेळवण्यात येणार आहे. पण, मालिकेतील उर्वरित सामन्यावर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहेच. कृणाल पांड्याला कोरोना झाल्यामुळे बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांचे मात्र डोके चक्रावले आहे. बाबो बबल मोडल्याची कोणतीच घटना नाही, टीम इंडियासाठी संपूर्ण ताज समूद्रा हॉटेल बुक केलं, स्टाफची वारंवारी कोरोना चाचणी, तरीही कृणालला कोरोना झालाच कसा, हा प्रश्न दोन्ही क्रिकेट मंडळांना पडला आहे. (  Taj Samudra hotel in Colombo has been booked entirely by Shikhar Dhawan led Team India to avoid such a virus fiasco)

 रत्नागिरीच्या दीप्तीचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न सचिन तेंडुलकर पूर्ण करणार; पुढे केला मदतीचा हात!

ESPNनं दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंका दौऱ्यावर खेळाडूंकडून कोणत्याही प्रकारे बायो-बबल नियमांचे उल्लंघन झालेले नाही. सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, ग्राऊन्समन आणि हॉटेल स्टाफ यांची नियमित कोरोना चाचणी केली जाते. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या बायो बबल नियमांचे सुपरव्हायझर प्रोफेसर अर्जुना डी सिल्व्हा यांनी सांगितले की, कृणाल पांड्याला कोरोना झालाच कसा, याबाबत मीही संभ्रमात आहे. ही मालिका बंद दरवाज्यात खेळवली जात आहे आणि सुरक्षित बायो बबलमध्ये खेळाडू आहेत, बायो बबल मोडल्याची कोणतीच घटना आहे. हॉटेल स्टाफ यांच्यावरही बंधन होती आणि त्यांचीही नियमित चाचणी केली जाते.''

कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात
 

आनंदाची बातमी अशी की दोन्ही संघातील खेळाडू व स्टाफ सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण, मालिकेवर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहेच. टीम इंडियातील 8 सदस्य कृणालच्या संपर्कात आले होते आणि त्यांना विलगिकरणात ठेवले असून त्यांच्या RT-PCRटेस्टचा रिपोर्ट येणं बाकी आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंची पुन्हा एकदा RT-PCR टेस्ट केली जाणार आहे.'' कोरोना नियमानुसार सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाते. आतापर्यंत कोणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. पण, खेळाडूंना विलगिकरणात ठेवले गेले आहे. त्यांची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल आणि पुन्हा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर सामना खेळवला जाईल,''असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यानं InsideSport ला सांगितले.

Tokyo Olympics: 97 वर्षांत देशाला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिलं, सरकारनं बक्षीस म्हणून 5 कोटी अन् घर दिलं!

दरम्यान, कृणाल पांड्या मालिकेतील उर्वरित सामन्यांत खेळणार नाही. त्याला 7 दिवसांचा विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागेल. त्यामुळे टीम इंडियाच्या अन्य सदस्यांसोबत 30 जुलैला त्याला भारतासाठी प्रवास करता येणार नाही. 7 दिवसांनंतर त्याचा रिपोर्ट निगिटिव्ह आला तर तो मायदेशात येऊ शकतो. ( Krunal Pandya won't be able to travel back with other Indian players on July 30th as he have to undergo 7 day quarantine and obtain negative RT-PCR report.) 

Web Title: IND vs SL 2nd T20: Entire Taj Samudra booked for Team India, BCCI confused how Krunal Pandya tested COVID positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app