रत्नागिरीच्या दीप्तीचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न सचिन तेंडुलकर पूर्ण करणार; पुढे केला मदतीचा हात!

महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं रत्नागिरी येथील 19 वर्षीय दीप्ती विश्वासराव हिचं डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:50 PM2021-07-27T19:50:46+5:302021-07-27T19:51:55+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar’s help puts teenager on path to realising her dream of becoming a doctor | रत्नागिरीच्या दीप्तीचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न सचिन तेंडुलकर पूर्ण करणार; पुढे केला मदतीचा हात!

रत्नागिरीच्या दीप्तीचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न सचिन तेंडुलकर पूर्ण करणार; पुढे केला मदतीचा हात!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं रत्नागिरी येथील 19 वर्षीय दीप्ती विश्वासराव हिचं डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दीप्तीचं स्वप्न पूर्ण झाल्यास रत्नागिरीतील झर्ये गावातील ती पहिली डॉक्टर ठरणार आहे. तेंडुलकर आणि त्याची संस्था सेवा सहयोग फाऊंडेशन यांनी दीप्तीला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Sachin Tendulkar and his organisation Seva Sahyog Foundation (SSF) decided to fund 19-year-old Dipti Vishvasrao’s endeavour)

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दीप्तीला लॉकडाऊनच्या काळात नेटवर्क शोधण्यासाठी कैऐक किलोमीटर पायपीट करावी लागायची. नेटवर्कच्या समस्येमुळे तिला ऑनलाईन क्लास अटेंड करण्यात बऱ्याच अडचणी यायच्या. त्याच्या तिच्या अभ्यासावर परिणाम व्हायचा आणि त्यामुळे जिथे नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी जाण्याचं तिनं ठरवलं. दीप्तीनं National Eligibility-cum- Entrance Test (NEET) परिक्षेत 720 पैकी 574 गुण मिळवले आणि त्याच जोरावर तिनं अकोला येथील सरकारी वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला, परंतु तिच्या कुटुंबीयाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नातेवाईक, शेजारी यांच्याकडून पैसे उसणे घेत कुटुंबीयांनी तिची प्रवेश फी भरली, परंतु दीप्तीला हॉस्टेलचा खर्च आणि अऩ्य खर्चासाठी आर्थिक चणचण जाणवत आहे. अशावेळी तेंडुलकर या कुटुंबीयांच्या मदतीला आला.

''सचिन तेंडुलकर फाऊंडेशननं मला स्कॉलरशीप दिली, याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. या स्कॉलरशीपमुळे माझ्या अभ्यासासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाचा भार उचलला जाणार आहे. त्यामुळे मला आता फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करता येणार आहे. डॉक्टर बनण्याचे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. अथक परिश्रम करून भविष्यात मी अनेक हुशार व गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेन, हे मी वचन देते,''असे दीप्तीनं म्हटले.  
तेंडुलकरची संस्थेनं मागील 12 वर्षांत चार राज्यांतील 24 जिल्ह्यांमधील 833 मुलांना आर्थिक मदत केली आहे. ( Tendulkar’s NGO SSF has supported 833 students across four states and 24 districts over the last 12 years). तेंडुलकरनं ट्विट केलं की,''स्वप्नांचा पाठलाग करून ते सत्यात उतरवणे काय असते हे दीप्तीच्या प्रवासातून दिसते. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, तिला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा.'' 

Web Title: Sachin Tendulkar’s help puts teenager on path to realising her dream of becoming a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.