IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video

India vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 01:37 PM2021-07-26T13:37:52+5:302021-07-26T13:38:26+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 1st T20I : Rahul Dravid’s disappointed reaction as Suryakumar Yadav throws away wicket after scoring fifty, Video | IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video

IND vs SL, 1st T20I : सूर्यकुमार यादवनं विकेट फेकली अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs SL 1st T20I live Updates Score Today : भारताच्या यंग ब्रिगेडनं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत केले.  पृथ्वी शॉचे पदार्पण निराशमयी ठरले, परंतु  सूर्यकुमार यादव, शिखर धवन आणि संजू सॅमसन ( 27)  यांनी संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावताना विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेची 5 वी विकेट 111 धावांवर पडली अन् पुढील 15 धावांत संपूर्ण संघ माघारी परतला.

शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. धवनने 36 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 46 धावा केल्या. सूर्यकुमारनं 34 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारासह 50 धावा केल्या. हार्दिक पांड्याला 10 धावा करता आल्या. इशान किशननं ( 20*) चांगला खेळ करताना संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. टीम इंडियानं 5 बाद 164 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव 126 धावांवर गुंडाळला. भारतानं हा सामना 38 धावांनी जिंकला. दीपकनं दोन, तर भुवीनं 22 धावांत 4 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून चरिथा असलंकाने 26 चेंडूंत 3 चौकार व तितकेच षटकार खेचून 44 धावा केल्या. 

सूर्यकुमार खेळपट्टीवर असल्यामुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते, परंतु चुकीचा फटका मारून तो बाद झाला. त्यानं स्वतः या विकेटवर नाराजी व्यक्त केली, तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही नाराज दिसले. 

पाहा व्हिडीओ...

Web Title: IND vs SL, 1st T20I : Rahul Dravid’s disappointed reaction as Suryakumar Yadav throws away wicket after scoring fifty, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.