IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात एक नव्हे, दोन नव्हे तर १२ खेळाडूंचे पदार्पण, ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडूंचा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 08:20 PM2021-07-29T20:20:54+5:302021-07-29T20:21:33+5:30

India vs Sri Lanka 3rd T20I : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेलेली असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर राखीव फळीतील खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला.

IND vs SL : 12 players have made their ODI/T20I debut for India in the ongoing Sri Lanka tour, 19 players used by a Team India in a T20I series | IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात एक नव्हे, दोन नव्हे तर १२ खेळाडूंचे पदार्पण, ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडूंचा वापर!

IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात एक नव्हे, दोन नव्हे तर १२ खेळाडूंचे पदार्पण, ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडूंचा वापर!

Next

India vs Sri Lanka 3rd T20I : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेलेली असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर राखीव फळीतील खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच जोरावर टीम इंडियानं वन डे मालिका २-१ अशी जिंकली आणि ट्वेंटी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आजच्या तिसऱ्या व निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात संदीप वॉरियर्सनं ( Sandeep Warier) पदार्पण केले. तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाकडून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १२ खेळाडूंनी पदार्पण केले आहे. ट्वेंटी-२० मालिकेत तर टीम इंडियानं सर्वाधिक १९ खेळाडूंना खेळवले आहे आणि हाही एक वेगळा विक्रम आहे.

 

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू विलगिकरणात आहेत. अशात दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चार नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. त्यात दुसऱ्या सामन्यात नवदीप सैनीला दुखापत झाली आणि त्याला मालिकेला मुकावे लागले. नवदीप सैनीच्या अनुपस्थितीत  संदीप वॉरियरची निवड झाली. या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं तब्बल १९ खेळाडूंना खेळवले. २०१६मध्ये ऑस्ट्रेलिया ( वि. भारत) आणि २०२०मध्ये रोमानिया ( वि. बल्गेरिया) यांनी ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडू खेळवले होते.  


पदार्पण करणारे खेळाडू 

  • वन डे संघ - इशान किशन, सूर्यकुमार यादव, के गौथम, चेतन सकारिया, नितिश राणा, राहुल चहर, संजू सॅमसन
  • ट्वेंटी-२० संघ - पृथ्वी शॉ, वरुण चक्रवर्थी, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल व संदीप वॉरियर्स
  •  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IND vs SL : 12 players have made their ODI/T20I debut for India in the ongoing Sri Lanka tour, 19 players used by a Team India in a T20I series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app