Rohit Sharma Becoming 4th Indian Cricketer To 20000 Runs In International Cricket : भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मोठा पल्ला सर केला आहे. मोठ्या फटकेबाजीसह स्फोटक अंदाजात डावाला सुरुवात करणाऱ्या हिटमॅन रोहित शर्मानं अगदी निवांत खेळी बहरत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हा टप्पा पार करणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. हा पल्ला गाठल्यावर त्याने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावत ६१ व्या अर्धशतकालाही गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन,विराट आणि द्रविडच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
रोहित शर्मा आधी भारताकडून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार केला होता. या एलिट क्लबमध्ये आता रोहित शर्माची एन्ट्री झाली आहे. क्रिकेट जगतात अशी कामगिरी करणारा तो १४ वा फलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे चार फलंदाज
- ३४३५७ - सचिन तेंडुलकर
- २७९१०- विराट कोहली
- २४२०८ - राहुल द्रविड
- २०००० - रोहित शर्मा