Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी

चौथ्या वनडे सामन्यातील चौथ्या डावात ७५ चेंडूत साजरे केले पहिले अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 20:22 IST2025-12-06T19:51:24+5:302025-12-06T20:22:22+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA 3rd ODI Live Yashasvi Jaiswal Record With Scores Maiden One Day International Century | Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी

Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी

IND vs SA, Yashasvi Jaiswal  Maiden ODIs Century : विशाखापट्टणमच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात युवा सलामीवीर जैस्वाल याने कसोटी आणि टी-२० स्टाईल फलंदाजीचा खास नजराणा श केला. एकदिवीय क्रिकेटमधील धावांचा संघर्ष संपवण्यासाठी त्याने आधी कसोटीतील संयम दाखवत अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या एकदिवसीय सामन्यातील चौथ्या डावात ७५ चेंडूचा सामना करुन त्याने पहिले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर गियर बदलून मोठे फटकेबाजी करत टी-२० स्टाईलमध्ये त्याने या खेळीचं शतकात रुपांतर केल्याचे पाहायला मिळाले. १११ व्या चेंडूत त्याने या शतकाला गवसणी घातली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला यशस्वी

भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारा यशस्वी जैस्वाल हा सहावा  फलंदाज ठरला आहे. याआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल आणि शुभमन गिल या मंडळींनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. या यादीत आता यशस्वी जैस्वालचा समावेश झाला आहे.

अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला

नागपूरच्या मैदानातून वनडे पदार्पण; शुभमन गिलच्या अनुपस्थितीत पुन्हा मिळाली संधी अन्...

यशस्वी जैस्वालनं यानं याच वर्षी नागपूरच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात तो १५ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील एकदिवसीय मालिकेत त्याला पुन्हा संधी मिळआली. रांचीच्या मैदानातील पहिल्या सामन्यात तो १८ धावांवर बाद झाला. रायपूरच्या दुसऱ्या वनडेतही तो २२ धावा करून परतला होता. पण तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याने आपला तोरा दाखवला.  

Web Title : यशस्वी जायसवाल का वनडे संघर्ष समाप्त, पहले अर्धशतक के साथ गति बढ़ी।

Web Summary : यशस्वी जायसवाल ने वनडे संघर्ष को समाप्त करते हुए विशाखापट्टनम में दक्षिण अफ्रीका के खिलाफ अपना पहला अर्धशतक बनाया। उन्होंने अवसर का लाभ उठाया, सभी प्रारूपों में अपनी क्षमता का प्रदर्शन किया, शुरुआत में सावधानी से खेला और फिर गति बढ़ाई। अब शतक में बदलने पर नजर।

Web Title : Yashasvi Jaiswal ends ODI struggle with maiden fifty, accelerates innings.

Web Summary : Yashasvi Jaiswal overcomes ODI struggles, scoring his first fifty against South Africa in Visakhapatnam. He seized the opportunity, showcasing his ability in all formats, initially playing cautiously before accelerating. Eyes are now set on converting it into a century.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.