IND vs SA 1st ODI Kuldeep Yadav Breaks Shane Warne 23 Year Old World Record : कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची सुरुवात विजयासह केली आहे. रांची येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने १७ धावांनी विजय नोंदवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या विजयात किंग कोहलीच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजीत कुलदीप यावनं 'चौकार' मारला. या सामन्यात चार विकेट्सचा डाव साधताना त्याने मोक्याच्या क्षणी मार्को यान्सेन आणि मॅथ्यू ब्रीट्झके सेट झालेल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत सामना भारताच्या बाजूनं वळला. पहिल्या सामन्यातील बहुमुल्य कामगिरीसह कुलदीप यावनं दिवंगत अन् दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचा २३ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चौथ्यांदा साधला चार विकेट्सचा डाव
रांची येथील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कुलदीप यादवनं आपल्या १० षटकांच्या कोट्यात ६८ धावा खर्च करताना त्याने मार्को यान्सेन, मॅथ्यू ब्रीट्झके, टोनी डी झॉर्झी आणि प्रेनेलान सुब्रायेन यांच्या रुपात ४ विकेट्स आपल्या नावे कल्या. वनडे कारकिर्दीत कुलदीपनं चौथ्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार विकेट्सचा डाव साधला आहे. याआधी कुलदीपनं २०१८ मध्ये केपटाउन आणि आणि ग्वालियरच्या मैदानात चार विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय २०२२ मध्ये दिल्लीच्या मैदानात त्याने अशी कामगिरी करून दाखवली होती.
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
शेन वॉर्नसह चहलचा विक्रम मोडला, कुलदीपनं जम्बा अनिल कुंबळेच्या रेकॉर्डशीही केली बरोबरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक वेळा ४ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादवनं भारताचा युझवेंद्र चहलसह दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा रेकॉर्ड मोडीत काढला आहेय या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी ३-३ वेळा चार विकेट्सचा डाव साधला आहे. कुलदीपनं १० व्या वेळी चार विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीसह त्याने कुंबळेची बरोबरी साधली आहे. वनडेत सर्वाधिक वेळा चार विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये मोहम्मद शमी अव्वलस्थानी आहे. त्याने १६ वेळा ही कामगिरी नोंदवली आहे. त्यापाठोपाठ या यादीत अजित आगरकरचा नंबर लागतो. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत १२ वेळा चार विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.