भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्याच कसोटी सामन्यातील पहिला दिवस गाजवला. पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करताना त्याने इंग्लंडच्या मैदानात पहिलं वहिलं शतक झळाकवले. या अविस्मरणीय खेळीनंतर त्याने आपल्या खास सिग्नेचर स्टाइलमध्ये सेलिब्रेशनही केल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला त्याच्या या आयकॉनिक सेलिब्रेशनची चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला त्याच्या फॅन गर्लचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
ये दिल का मामला..
इंग्लंडमधील लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात शुबमन गिलनं भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना शतकी खेळीसह नव्या पर्वाची एकदम झोकात सुरुवात केली. या शतकी खेळीनंतर गिलनं आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये झुकून शतकी आनंद साजरा केला. फॅन गर्लचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ maitry shah Dhami या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. टेलिव्हिजनवर शुबमन गिलच्या खेळीचा आनंद घेताना चाहतीचा आनंदही गगनाला भिडल्याचे दिसून येते. कैलास खेर यांच्या "हो जी, हाँ-हाँ जी हो गयी मैं...तेरी दीवानी दीवानी" या गाण्यासह ही चाहती शुबमन गिलसाठीची आपली 'दिवानगी' व्यक्त करताना दिसते.
कोण आहे शुबमन गिलची 'दिवानी'?
सोशल मीडियावरील बायोनुसार, शुबमन गिलची मोठी चाहती असलेल्या या फॅन गर्लचं नाव Shaini Jetani असल्याचे दिसून येते. ती एक मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या रुपात ओळखली निर्माण करताना दिसते. शुबमन गिलवरील प्रेम व्यक्त करण्याची ही काही तिची पहिली वेळ नाही. याआधी आयपीएलमध्येही ती शुबमन गिलला चीअर करताना दिसली आहे. @maitry shah Dhami या सोशल मीडिया हँडलशिवाय @shainijetani.9 या अकाउंटवरूनही तिने शुबमन गिलसंदर्भातील अनेक व्हिडिओ शेअर केल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल.
Web Title: IND vs ENG Shubman Gill Fan Girl Shaini Jetan Signature Pose With Team India Captain On Front Of TV Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.