इंग्लंड दौऱ्यातून शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटीच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. २० जून पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होतीये. या दौऱ्यात रिषभ पंत हा उप कर्णधार असूनही त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते. यामागचं कारण आहे ते म्हणजे बॅकअप विकेट किपरच्या रुपात टीम इंडियाच्या ताफ्यात स्थान मिळवणारा ध्रुव जुरेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतचा प्लेइंग इलेव्हनमधील पत्ता कट होणार?
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी भारतीय 'अ' संघ इंग्लंड लायन्स विरुद्ध अनौपचारिक कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिल्या कसोटी मालिकेतील दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणाऱ्या ध्रुव जुरेल याने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावातही फिफ्टी ठोकलीये. इंग्लंडच्या मैदानात चमकणाऱ्या या 'ध्रुव' ताऱ्यामुळे पंतचा प्लेइंग इलेव्हनमधील पत्ता कट होऊ शकतो.
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
पंतचा संघर्ष शतकी खेळीसह संपला, पण ...
रिषभ पंत हा मागील काही सामन्यात सातत्याने अपयशी ठरताना दिसून आले आहे. ज्या लखनौच्या संघाने त्याला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली त्या संघाकडून खेळताना प्रत्येक सामन्यात तो अपयशी ठरला. आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात त्याने शतकी खेळीसह इंग्लंड दौऱ्यात छाप सोडण्यासाठी तयार असल्याची झलक दाखवली. पण इथं त्याला ध्रुव जुरेल कडवी टक्कर देताना दिसतोय. ध्रुव जुरेलचा धमाकेदार कामगिरी पंतवरील दबाव वाढवणारी आहे. कारण पंतपेक्षा तो पर्याय टीम इंडियासाठी सर्वोत्तम ठरू शकतो, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
ध्रुव जुरेलची दमदार कामगिरी
भारत 'अ' संघाकडून ध्रुव जुरेल याने इंग्लंडच्या मैदानात सुरु असलेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यातील पहिल्या तीन डावात ५० पेक्षा अधिक धावा करत एकूण १९९ धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यने टीम इंडियातील आपली दावेदारी मजबूत केल्याचे दिसते. पहिल्या दोन कसोटीत रिषभ पंतलाच पहिली पसंती मिळेल. पण जर या दोन सामन्यात छाप सोडण्यात तो कमी पडला तर शुबमन गिल आणि कोच गंभीर त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संधी देऊ शकतात.
Web Title: IND vs ENG How Dhruv Jurel is Slowly Confirming a Place in India’s Test XI Rishabh Pant Might Be Dropped
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.