IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?

Gautam Gambhir, VVS Laxman, IND vs ENG: व्हीव्हीएस लक्ष्मणला इंग्लंडमध्ये भारतीय संघासोबत पाहून अनेकांना विविध प्रश्न पडलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:51 IST2025-06-18T12:45:08+5:302025-06-18T12:51:39+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Gautam Gambhir absent due to personal reasons VVS Laxman in England as coach with Team India but why | IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?

IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Gautam Gambhir, VVS Laxman, IND vs ENG: व्हीव्हीएस लक्ष्मण गेल्या दोन दिवसांपासून इंग्लंडमध्ये भारतीय संघासोबत दिसला आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या उपस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लक्ष्मणच्या इंग्लंड दौऱ्याबद्दल मीडिया रिपोर्ट्स वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, परंतु एका गोष्टीची त्याहूनही अधिक चर्चा आहे, ती म्हणजे भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या कुठेच दिसत नाहीये. त्याच्या जागी लक्ष्मण भारतीय संघासोबत दिसतोय.

लक्ष्मण इंग्लंडमध्ये काय करतोय?

लक्ष्मणने इंग्लंडमध्ये एकूण ३४ प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. त्याने तीन वेगवेगळ्या दौऱ्यांवर (२००२, २००७ आणि २०११) खेळलेल्या ११ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने २००७ आणि २००९ मध्ये लँकेशायरसाठी १६ काउंटी सामने खेळले. उर्वरित ७ सामने तो भारताच्या दौऱ्यावरील संघासाठी खेळला आहे जे सहसा इंग्लिश काउंटी किंवा 'लायन्स' संघाविरुद्ध असतात. लक्ष्मण सध्या बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सशी संबंधित आहे आणि तो भारतीय क्रिकेट व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. असे मानले जाते की तो इंग्लंडमधील भारतीय संघाच्या प्रशिक्षकांशी बोलू शकतो आणि तिथे खेळण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना देऊ शकतो, परंतु त्याहून जास्त काही नाही. तो एक-दोन दिवसांत इंग्लंडहून परत येऊ शकतो अशी बातमी आहे.

लक्ष्मणबद्दल काय चर्चा?

BCCIच्या एका सूत्राने क्रिकबझला सांगितले की, लक्ष्मण इतर काही कामासाठी इंग्लंडला गेला आहे, त्याच्याकडे भारतीय संघाची कोणतीही अधिकृत जबाबदारी नाही. तो लॉसाने (स्वित्झर्लंड) येथून लंडनला आला आहे. दुसऱ्या सूत्राने सांगितले की, टीम इंडियाचे लक्ष्य इंग्लंडमध्ये जिंकणे आहे. लक्ष्मण प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांशी बोलला असेल आणि सराव सामना पाहिला असेल, परंतु या संघात त्याची कोणतीही भूमिका नाही.

एक अशीही चर्चा

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या संघासोबत नाही. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो दिल्लीला परतला. त्यामुळे कदाचित लक्ष्मण संघासोबत दिसतो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर पुढील तीन दिवसांत किंवा कदाचित सोमवारपर्यंत संघात सामील होऊ शकतो. पहिल्या कसोटीपूर्वी गंभीर निश्चितच संघात सामील होईल. त्याने त्याच्या आईच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. पण ती अजूनही आयसीयूमध्ये आहे. गंभीर लवकरच परतण्याची योजना आखेल असे सांगितले जात आहे.

Web Title: IND vs ENG Gautam Gambhir absent due to personal reasons VVS Laxman in England as coach with Team India but why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.