IND vs ENG, 4th T2O, Suryakumar Yadav : OUT or NOT OUT; सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीला अनपेक्षित ब्रेक

IND vs ENG, 4th T2O : Suryakumar Yadav सॅम कुरनच्या गोलंदाजीवर डेवीड मलाननं त्याचा झेल टिपला. चेंडू ग्राऊंडला टच असल्याचे दिसत होते, पण मैदानावरील पंचांनी बाद दिल्यामुळे तिसऱ्या पंचांनीही निकाल कायम राखला. विराट कोहलीनंही या निर्णयाविरोधात शिवी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:21 PM2021-03-18T20:21:29+5:302021-03-18T20:23:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th T2O : Suryakumar Yadav goes for a fantastic 57 in 31 balls, controvercy over his wicket, Virat Kohli get angry | IND vs ENG, 4th T2O, Suryakumar Yadav : OUT or NOT OUT; सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीला अनपेक्षित ब्रेक

IND vs ENG, 4th T2O, Suryakumar Yadav : OUT or NOT OUT; सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीला अनपेक्षित ब्रेक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मिळालेल्या संधीचं सोनं करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून त्यानं पदार्पण केलं, परंतु त्याला एकही चेंडू खेळता आला नव्हता. पण, तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती दिली. चौथ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आणि बॅटीवर हात साफ करण्याचीही संधी मिळाली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं खणखणीत षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्या आगमनाची झलक दाखवली. त्यानं २८ चेंडूंत अर्धशतक झळकावताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score


चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरवले.  रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. जोफ्रा आर्चरनं चौथ्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर रोहितचा सुरेख रिटर्न कॅच टिपला. रोहितनं १२ चेंडूंत १२ धावा केल्या. लोकेश राहुल आज मोठी खेळी करेल, असे वाटत असतानाच माशी शिंकली. बेन स्टोक्सनं त्याला १४ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. विराटला आदिल राशिदच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही आणि तो यष्टिचीत झाला. Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score

सूर्यकुमार यादवनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिल्याच डावात अर्धशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. ( 50s in Maiden T20I inning for India) रॉबीन उथप्पा ( वि. पाकिस्तान, २००७), रोहित शर्मा ( वि. दक्षिण आफ्रिका, २००७), अजिंक्य रहाणे ( वि. इंग्लंड, २०११), इशान किशन ( वि. इंग्लंड, २०२१) यांनी असा पराक्रम केला आहे. पण, ३१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून तो ५७ धावांवर माघारी परतला. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर डेवीड मलाननं त्याचा झेल टिपला. चेंडू ग्राऊंडला टच असल्याचे दिसत होते, पण मैदानावरील पंचांनी बाद दिल्यामुळे तिसऱ्या पंचांनीही निकाल कायम राखला. विराट कोहलीनंही या निर्णयाविरोधात शिवी दिली. Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng T20 Live Match



Web Title: IND vs ENG, 4th T2O : Suryakumar Yadav goes for a fantastic 57 in 31 balls, controvercy over his wicket, Virat Kohli get angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.