India vs England, 2nd Test Day 2 : भारतीय गोलंदाजांनी पोषक खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांची गोची केली. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ३२९ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा निम्मा संघ ५२ धावांत माघारी परतला. आर अश्विन ( R Ashwin) यानं तीन विकेट्स घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. तत्पूर्वी, तळाचे ४ फलंदाज २९ धावांत माघारी परतल्यानं टीम इंडियाला पहिल्या डावात ३२९ धावांवर समाधान मानावे लागले. रिषभ पंत ( Rishabh Pant) ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी; दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज मैदानाबाहेर!
- भारतानं ६ बाद ३०० धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरूवात केली. रिषभ पंतनं फटकेबाजी करताना कसोटी क्रिकेटमधील ८वे अर्धशतक पूर्ण केलं. मोईन अली ४, ऑली स्टोन ३ आणि जॅक लिच यानं २ विकेट्स घेतल्या.
- इशांत शर्मानं पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानं रोरी बर्न्सनं पहिल्याच षटकात पायचीत केलं. त्यानंतर आर अश्विननं इंग्लंडचा दुसरा सलामीवीर डॉम सिब्ली ( १६) याची विकेट घेतली.इंग्लंडनं मोडला ६६ वर्षांपूर्वीचा भारताचाच विक्रम, रोहित शर्माचा मोठा पराक्रम
- पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलनं इंग्लंडला मोठा धक्का दिला. पहिल्या कसोटीतील द्विशतकवीर जो रूटला ( Joe Root) याला बाद केले. ही भारतासाठी मोठी विकेट ठरली.
- त्यानंतर अश्विननं दोन विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्सचा ( १८) त्रिफळा उडवून त्यानं विक्रमाला गवसणी घातली. बेन स्टोक्सला सर्वाधिक ९वेळ बाद करण्याचा विक्रम अश्विननं नावावर केला.
- या विकेटसह आर अश्विननं ३५०वी आंतरराष्ट्रीय बळी टिपण्याचा विक्रम केला. अनिल कुंबळे ( ४७६) आणि हरभजन सिंग ( ३७६) यांच्यानंतर हा पराक्रम करणारा अश्विन हा तिसरा भारतीय गोलंदाज आहे.
- जानेवारी २०१५नंतर कसोटीत सर्वाधिक २७५ विकेट्सही अश्विनच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियॉन २६५ विकेट्ससह दुसऱ्या आणि इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड २५३ विकेट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. Rishabh Pant अन् बेन फोक्स यांच्यात राडा; भारतीय खेळाडूचा स्ट्राइक घेण्यास नकार, Video
- भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्सच्या विक्रमात आर अश्विननं फिरकीपटू हरभजन सिंगला मागे टाकले. अनिल कुंबळे ३५० विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर अश्विन ( २६६), हरभजन ( २६५), कपिल देव ( २१९) आणि रवींद्र जडेजा ( १५७) यांचा क्रमांक येतो.