India vs England, 2nd Test : इंग्लंडनं मोडला ६६ वर्षांपूर्वीचा भारताचाच विक्रम, रोहित शर्माचा मोठा पराक्रम

England break a 66-year-old record in Test cricket : रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. याचसोबत त्यानं २०२१मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा पूर्ण केला. भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला... रिषभ ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला.

India vs England, 2nd Test Day 2: रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांनी रचलेल्या मजबूत पायावर टीम इंडियाच्या अन्य शिलेदारांना धावांचे इमले रचता आले नाही. ६ बाद ३०० धावांवरून दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्याच षटकात मोईन अलीनं ( Moeen Ali) दोन धक्के दिले.

रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. याचसोबत त्यानं २०२१मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा पूर्ण केला. भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला... रिषभ ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला.

टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी फक्त २९ धावांची भर घालता आली. मोईन अली ४, ऑली स्टोन ३ आणि जॅक लिचने घेतल्या २ विकेट्स... या सामन्यात इंग्लंडनं ६६ वर्षांपूर्वीचा टीम इंडियाचा एक विक्रम मोडला आणि रोहित शर्माच्या नावावरही मोठा पराक्रम नोंदवला गेला.

पहिल्या डावात भारताचे चार फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. चार फलंदाज भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर एका खेळाडूनं सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजांत रोहितनं दुसरे स्थान पटकावले. २००३मध्ये मेलबर्न कसोटीत वीरेंद्र सेहवागनं १९५ धावा केल्या होत्या, रोहितनं चेन्नईत १६१ धावा केल्या. २०१८मध्ये लोकेश राहुलनं इंग्लंडविरुद्ध १४९ धावा केल्या.

इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला. दोन्ही संघाचे सलामीवर शून्यावर बाद होण्याची ही भारतातील कसोटीतील तिसरी वेळ... भारताचा सलामीवर शुबमन गिल व इंग्लंडचा फलंदाज रॉरी बर्न्स शून्यावर बाद झाला. यापूर्वी १९७७मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान, १९८७मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात असा योगायोग जुळून आला होता.

आजच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून रिषभ पंतनं वृद्धीमान सहा याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमधील रिषभचे हे ८ वे अर्धशतक ठरले. भारताकडून कसोटीत सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाजांमध्ये महेंद्रसिंग धोनी ( ३९) आघाडीवर आहे. त्यानंतर फारूख इंजिनिअर ( १८), सय्यद किरमानी ( १४) यांचा क्रमांक येतो. नयम मोंगिया व किरण मोरे यांच्या नावावर प्रत्येकी ७ वेळा ५०+ खेळीची नोंद आहे.

आजच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. भारताच्या ३२९ धावांत एकही अतिरिक्त धाव नाही. १९५४-५५मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लाहोर कसोटीत भारतीय गोलंदाजांनी ३२८ धावांत एकही अतिरिक्त धाव दिली नव्हती. इंग्लंडनं तो ६६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

एकही अतिरिक्त धाव न मिळवता सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मानं अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी २०१९च्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत तमिम इक्बालनं १२६ धावा केल्या होत्या.