Suryakumar Yadav fitness test: आशिया चषक संघ निवडीआधी भारतीय टी- २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने शनिवारी बेंगळुरू येथील 'बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. सूर्यकुमार शेवटचा सामना आयपीएलमध्ये खेळला.
तो 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरला होता. या आक्रमक फलंदाजाने जूनमध्ये जर्मनीतील म्यूनिख येथे पोटाच्या खालच्या उजव्या भागात 'स्पोर्टस हर्निया'ची शस्त्रक्रिया केली होती.
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, 'शस्त्रक्रियेनंतर पनरागमन करण्यापर्वी फिटनेस चाचणी अनिवार्य असते. सूर्यकुमारने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. 'फिटनेस मिळवल्यानंतर सूर्या मंगळवारी मुंबईत होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहील. आशिया चषकषाचे आयोजन यूएईत ९ सप्टेंबरपासून होणार आहे.
Web Title: Important news for Indian cricket fans T20 team captain Suryakumar Yadav passed fitness test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.